Apsara Aali Song Hemangi Kavi Dance Instagram
मनोरंजन बातम्या

'खरंच अप्सरा...', Hemangi Kaviचा डान्स पाहून नेटकऱ्याची भन्नाट प्रतिक्रिया, पाहा VIDEO

Hemangi Kavi Dance Video: नुकतंच अभिनेत्री हेमांगी कवीने इन्स्टाग्रामवर झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ मालिकेच्या सेटवरील एक रिल शेअर केला आहे.

Chetan Bodke

Apsara Aali Song Hemangi Kavi Dance

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी अभिनय तर कधी आपल्या फोटो पोजेसमुळे चर्चेत राहणाऱ्या हेमांगीच्या डान्सची सध्या इन्स्टाग्रामवर जोरदार चर्चा होत आहे. नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ मालिकेच्या सेटवरील एक रिल तिने शेअर केला आहे. अभिनेत्रीने शुटिंग दरम्यान, ‘अप्सरा आली’ गाण्यावर हटके डान्स करत खुप सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. (Marathi Actress)

फक्त मराठी सिनेसृष्टीतच नाही तर हिंदी टेलिव्हिजनसृष्टीतही हेमांगीच्या अभिनयाचा डंका वाजत आहे. हेमांगी कवी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच हेमांगीने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हेमांगीने ‘नटरंग’ चित्रपटातील ‘अप्सरा आली’ गाण्यावर सुंदर रिल शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना हेमांगीने तिचा रिल मराठमोळे गायकाची जोडी अजय-अतुल,अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गायिका बेला शेंडे, डान्स कोरिओग्राफर फुलवा खामकर आणि दिग्दर्शक रवी जाधव यांना व्हिडीओ शेअर केला आहे. (Viral Video)

हेमांगी कवीने इन्स्टाग्रामवर झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ मालिकेच्या सेटवर हा रिल शूट केला आहे. डार्क ग्रीन कलरची काठा पदराची साडी परिधान करून हेमांगी कवीने हा डान्स केला आहे. हेमांगीच्या ह्या डान्सचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. हेमांगीच्या डान्सचे कौतुक सोनाली कुलकर्णी आणि फुलवा खामकर सह चाहत्यांनी तिच्या डान्सचे कौतुक केले आहे. हेमांगीच्या या रिलवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Social Media)

हेमांगी सध्या झी टिव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ या मालिकेमध्ये काम करत आहे. या मालिकेमध्ये हेमांगी कवी भवानी चिटणीसची भूमिका साकारत आहे. नुकताच पार पडलेल्या 'झी रिश्ते अवॉर्ड २०२४'मध्ये हेमांगी कवीला 'बेस्ट माँ' म्हणजेच सर्वोत्कृष्ट आईच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ ही मालिका गेल्या वर्षापासूनच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अवघ्या काही दिवसांतच मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य निर्माण केले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT