Devoleena Bhattacharjee News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Devoleena Bhattacharjee: देवोलिना भट्टाचार्जीच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या, PM मोदींकडे केलं मदतीचं आवाहन

Devoleena bhattacharjee Post: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या (ट्वीटर) माध्यमातून ‘साथ निभाना साथियाँ’ फेम देवोलिना भट्टाचर्जीने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीचा हात मागितला आहे.

Chetan Bodke

Devoleena Bhattacharjee

‘साथ निभाना साथियाँ’ मालिकेमधील ‘गोपी बहू’च्या भूमिकेतून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली. अभिनेत्री देवोलिना कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. (Bollywood)

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या (ट्वीटर) माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीचा हात मागितला आहे. देवोलिनाचा मित्र अमरनाथ घोषची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या झाली आहे. या घटनेसंबंधित अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लक्ष घालावं अशी विनंती केली आहे. (Bollywood Actress)

देवोलिना भट्टाचार्जी आपल्या ट्वीटमध्ये म्हणते, “माझा मित्र अमरनाथ घोष याची मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतल्या सेंट लुईस अकॅडमीच्या परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या वडीलांचे त्याच्या बालपणीच निधन झाले तर, त्याच्या आईचं ३ वर्षांपूर्वी निधन झालेलं आहे. त्यामुळे त्याच्याजवळ मित्रांशिवाय कोणीही उरले नाही. इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये आरोपींविषयी काहीही समजलेले नाही.. याशिवाय सद्यस्थितीत त्याच्या कुटुंबात आम्हा मित्रांशिवाय इतर कोणीही नाही. तो कोलकात्यामध्ये राहायचा..” (Social Media)

आपल्या ट्वीटमध्ये देवोलिना पुढे म्हणते, “अमरनाथ एक उत्तम डान्सर होता. तो अमेरिकेमध्ये तो पीएचडीचं शिक्षण पूर्ण करत होता. तो जेव्हा सायंकाळी वॉकला गेला होता तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सध्या अमेरिकेतील काही मित्र त्याचा मृतदेह भारतात परत आणण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अजूनही त्याच्या कोणत्याही आरोपी विषयी देखील काहीही माहिती समोर आलेली नाही..” अभिनेत्रीने पुढे आपल्या ट्वीटमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे "कृपया तुम्हाला शक्य असल्यास या प्रकरणाची चौकशी करावी. निदान त्याच्या हत्येचे कारण कळावे." अशी मागणी केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

Raigad Tala Fort: रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा|Video Viral

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

प्रवासी वाहनांना अडवून लूटमार! सोलापूर–धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित|VIDEO

SCROLL FOR NEXT