Ankita Lokhande Father Passed Away Saam TV
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande Father Death : प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने खचून गेली

Ankita Lokhande Father Passed Away : अंकिताचे वडील श्रीकांत लोखंडे यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ankita Lokhande Father Passed Away At 68

टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंकिताचे वडील श्रीकांत लोखंडे यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. वडिलांचं छत्र हरपल्यानं अंकिता खचून गेली आहे.

अंकिता लोखंडेचे (Ankita Lokhande) वडील श्रीकांत लोखंडे यांचे आज मुंबईत (Mumbai) निधन झाले. त्यांचे निधन नेमके कोणत्या कारणांमुळे झाले, हे अद्याप कळू शकलेले नाही. श्रीकांत लोखंडे यांचे पार्थिव इंटरफेस अपार्टमेंटमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या, रविवारी सकाळी ११ वाजता ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.(Latest Entertainment News In Marathi)

वडिलांच्या निधनाने अंकिता पार खचून गेली आहे. तिचं वडिलांवर खूप प्रेम होतं. बऱ्याचदा ती आपल्या वडिलांसोबतचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वडिलांच्या निधनानंतर अंकिता स्वतः खचून गेली असली तरी, ती आपल्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

अंकिता सुशांतसिंह राजपूतसोबतच्या 'पवित्र रिश्ता'मधून घराघरात पोहोचली. अंकिता लोखंडे प्रसिद्ध अभिनेत्री असून, अभिनयानं तिनं टीव्ही इंडस्ट्रीत आपली छाप पाडली आहे. २००९ मध्ये अंकितानं अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्यासोबतच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं.

काही दिवसांपूर्वी अंकिता आणि पती विकी जैन यांनी विदेशात जाऊन लग्नाचे सर्व विधी पुन्हा केले होते. त्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

SCROLL FOR NEXT