TV Actress Akanksha Juneja Duped While Ordering Food Online Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akanksha Juneja Cheated: टीव्ही अभिनेत्रीला ऑनलाईन फूड ऑर्डर करणं पडलं महागात, लिंक क्लिक करताच अकाऊंटमधील पैसे उडाले

Chetan Bodke

TV Actress Akanksha Juneja Duped While Ordering Food Online: सध्या दिवसेंदिवस देशात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ऑनलाईन फ्रॉडचा गंडा सामान्य नागरिकांनाच नाही तर, सेलिब्रिटींनाही बसताना दिसत आहे. नुकताच ऑनलाईन फ्रॉडचा गंडा एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला बसला आहे. तिने ऑनलाईन जेवणाची ऑर्डर देताना तिची फसवणूक झाली आहे.

‘साथ निभाना साथिया’ आणि ‘कुंडली भाग्य’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या आकांक्षा जुनेजाची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ‘कुंडली भाग्य’मध्ये आकांक्षा जुनेजाने निधी नावाचे पात्र साकारले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षाची ऑनलाईन फसवणुक झाल्याची माहिती समोर आली आहे. सायबर फसवणुक झाल्याने तिला फार मोठा आर्थिक फटका बसलाय.

मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा ऑनलाईन जेवणाची ऑर्डर देत होती, ऑर्डर देत असतानाच तिला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. त्याने तिला तो त्याच फूड डिलिव्हरी ॲपचा कर्मचारी असल्याचं सांगितलं. त्यावेळी आकांक्षाला त्या व्यक्तीने एक फ्रॉड लिंक पाठवली आणि तिची ऑर्डर कन्फॉर्म करण्यासाठी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करायला सांगितलं. जेव्हा आकांक्षाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्यावेळी तिने त्या व्यक्तीला याबाबत काही प्रश्न केला, तेव्हा समोरुन तिला हा प्रोटोकॉल असल्याचं सांगितलं.

त्या व्यक्तीने आकांक्षाला लिंकवर क्लिक करण्यासाठी आग्रह केला. तिने लिंकवर क्लिक करताच तिचं संपूर्ण बँक अकाऊंट खाली झालं. टेलिव्हिजन अभिनेत्रीने लिंकवर क्लिक करताच दर ५ मिनिटांच्या अंतराने तिच्या खात्यातून १०,००० रू. कापले जात होते. तिने सांगितल्याप्रमाणे, तिच्या खात्यात ३०,००० रू. होते.

आपल्या अकाऊंटमधून पैसे कट झाले हे कळताच तिने लगेचच बँकेशी संपर्क केला आणि तिची ऑनलाईन फसवणुक झाल्याची माहिती दिली. त्यामुळे बँकेने अभिनेत्रीचे अकाऊंट लगेचच ब्लॉक केले. मात्र, तोपर्यंत तिच्या खात्यातून ३० हजार रुपये कापले गेले होते.

आकांक्षा पुढे मुलाखतीत म्हणते, जेव्हा मेहनतीने कमवलेला पैसा विनाकारण जातो, त्यावेळी मनाला खूप त्रास होतो. यावेळी आकांक्षाने चाहत्यांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT