Siddharth Jadhav Comedy Movie Aflatoon : बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची चर्चा आहे. बाईपण भारी देवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली आहे. तर आता विनोदी चित्रपट अफलातून देखील बॉक्स ऑफिसवर धडकला असून चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
या चित्रपटानं दोन दिवसात बॉक्स ऑफिस चांगली कमाई केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आहे. (Latest Entertainment News)
चित्रपटाची अफलातून कमाई
शुक्रवारी २१ जुलै रोजी अफलातून चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ०.९५ कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी २.०३ कोटींची कमाई केली. या आठवड्याच्या अखेरपर्यंत चित्रपट ५ कोटींपर्यंत आकडा गाठू शकतो अशी शक्यता निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत १. २० कोटी, मराठवाडा मध्ये २९.८३ लाख आणि उर्वरित महाराष्ट्रात ६३.५९ लाखांची कामे चित्रपटाने केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर यांसह विविध शहरांतून चित्रपटाला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे.
तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्रांची धमाल या चित्रपटामध्ये दाखविण्यात आली आहे. या तिघांपैकी एक आंधळा, एक मुकाआणि बहिरा असतो. या मुख्य भूमिका सिद्धार्थ जाधव, पारितोष पेंटर आणि जयेश ठक्कर साकारत आहेत.
तर या तिघांशिवाय चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा, रेशम टिपणीस अशी स्टारकास्ट आहे. तसेच पारितोष पेंटर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. (Celebrity)
अफलातून चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर आणि त्याचा मुलगा जेसी लिव्हर पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये काम करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.