Kiran Mane In Sindhutai Mazi Mai Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran Mane New Post:दीड वर्षांपूर्वी 'ती' घटना घडली आणि आज... किरण मानेंची स्वातंत्र्यदिनी सणसणीत पोस्ट

Kiran Mane New Serial: ‘बिग बॉस मराठी ४’नंतर पुन्हा एकदा किरण माने टेलिव्हिजनवर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतेच किरण मानेंनी मालिकेविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Kiran Mane In Sindhutai Mazi Mai: अभिनेता किरण माने पुन्हा एकदा टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजपासून किरण मानेंची नवी कोरी मालिका कलर्स मराठीवर ‘सिंधूताई माझी माई’ ही मालिका टेलिकास्ट होणार आहे. ‘बिग बॉस मराठी ४’नंतर पुन्हा एकदा किरण माने टेलिव्हिजनवर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकतेच किरण मानेंनी मालिकेविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “आज ‘स्वातंत्र्य दिना’च्या दिवशी मी परत येतोय, ताठ मानेनं, ताठ कण्यानं! दिड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी, ती घटना घडल्यावर मी सोशल मिडीयावर येऊन बोललो होतो... “काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !” आज ते सिद्ध करून दाखवलं ! पण मला आनंद होतोय तुमच्यासाठी. 'त्या' सगळ्या काळात तुम्ही मायबाप प्रेक्षक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात.” (Marathi Actors)

पोस्टमध्ये पुढे किरण माने म्हणतात, “मला पूर्वीपेक्षा शंभरपटींनी प्रेम दिलंत. त्यामुळं आज या क्षणी नम्रपणे तुम्हा चाहत्यांच्या पायाशी रहाणं, हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचं असेल. मी जी कलाकृती तुमच्यासाठी घेऊन येतोय, ती साधीसुधी नाय माझ्या भावांनो. शेकडो संकटांचा पहाड पार करून, हजारो अनाथांची माय झालेल्या सिंधुताईंवरची मालिका आहे ही! माईंच्या काळजात ज्या व्यक्तीबद्दल 'स्पेशल' जागा होती.” (Serial)

पोस्टमध्ये पुढे किरण माने म्हणतात, “ज्यानं माईंच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया घातला, तो तुम्हाला माहित नसलेला 'अनसंग हिरो' मी साकारणार आहे. पैज लावून सांगतो, तो आणि त्याच्या लेकीमधला गहिरा जिव्हाळा पाहून तुम्ही हरवून जाल. हरखून जाल. यांना रोज भेटायची ओढ लागेल तुम्हाला ! त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळुन फक्त एक वर्षच झालंवतं जेव्हा विदर्भातल्या एका छोट्या खेड्यातल्या, त्या माणसाच्या घरी हे अफलातून लेकरू जन्माला आलं.” (Entertainment News)

पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने म्हणतात, “आपली भुमी स्वतंत्र झालीवती, पण आपल्या जुनाट समाजव्यवस्थेतनं 'स्त्री' मुक्त नव्हती झाली. ती चारभिंतीच्या आत गुलामगिरीचे चटके सोसतच होती. अशा काळात सख्ख्या आईसकट सगळ्यांनी नाकारलेल्या लेकीला पोटाशी धरणारा... जीव लावणारा... तिला जोपासणारा... घडवणारा... 'बापमाणूस', द ग्रेट अभिमान साठे पुन्हा जिवंत करायला मिळणं, हे 'अभिनेता' म्हणून सुख आहे हो... निव्वळ सुख ! 'कमबॅक' अजून कसा पायजे सांगा बरं? माझी खात्रीय आजपासून रोज संध्याकाळी ७ वाजता 'कलर्स मराठी' चॅनलवर येऊन, हा अद्भूत प्रवास तुम्ही बघणार आहातच.. पण तुमच्या मुलाबाळांनासुद्धा आवर्जुन दाखवा...”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT