Gaurav More Wedding Rumors: कायमच कॉमेडी शोमध्ये अग्रस्थानी असलेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो नेहमीच टीआरपी मध्ये अग्रस्थानी आहे. या शोने काही दिवसांसाठी प्रेक्षकांची रजा घेतली होती. पण आता १४ ऑगस्टपासून अर्थात आजपासून हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला. कायमच शो प्रमाणे त्यातील कलाकार देखील कायमच चर्चेत असतात. सध्या शो मधील सर्वच कलाकार प्रमोशन मध्ये व्यग्र आहेत. अशातच एका इंटरव्ह्यूमध्ये दत्तू मोरेनंतर कोणता कलाकार लग्नबंधनात अडकणार? याचा त्या मुलाखतीत खुलासा झाला आहे.
सध्या मालिकेतील सर्वच कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतच शो मधील सर्व कलाकारांनी ‘It's मज्जा’ या युट्यूब चॅनलला त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत गौरव मोरे, निमिष कुलकर्णी आणि समीर चौघुले हे कॉमेडीची त्रिकुट सहभागी झाले होते. यावेळी त्यांना ‘आता दत्तू मोरनंतर कोणता कलाकार लग्नबंधनात अडकणार ?’ असा प्रश्न विचारला होता.
त्या प्रश्नावर त्याच्या खास विनोदी शैलीमध्ये उत्तर देताना निमिष कुलकर्णी म्हणाला, “दत्तू मोरेंनंतर आता लवकरच गौरव मोरेचं लग्न होणार आहे. त्याची होणारी पार्टनर कॅनडा मधली मुलगी आहे. मध्ये तो गेले काही दिवस कॅनडामध्ये गेला होता. त्यावेळी त्याला तिथे एक पंजाबी मुलगी भेटली होती.” निमिषच्या या विनोदी उत्तरावर गौरवनेही प्रतिक्रिया दिली, तो म्हणतो, “असं काही नाही.”
नंतर पुढे समीर चौघुले यांनीही गौरव मोरच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली. तर म्हणतात, ‘गौरवचं लग्न होणार नाही. कारण, माझ्या अंदाजे, गौरवनं स्वयंवर करायला हवं. एका मोठ्या हॉलमध्ये मुली हातात हार घेऊन उभ्या असतील, आणि त्यांच्यातली एक नवरी आपली लाईफ पार्टनर म्हणून तो निवडेल. अशा प्रकारे त्याचं स्वयंवर व्हायला हवं असं मला वाटतं. सध्या गौरव महाराष्ट्रातला Most Eligible Bachelor तरूण आहे. आम्ही अमेरिकेमध्ये शोसाठी गेलो होतो, त्यावेळी आम्ही त्याची एन्ट्री होताच परदेशातल्या अनेक तरूणींना पाहिलं आहे. कारण मला त्याची महाराष्ट्रातच नाही तर, परदेशातही किती लोकप्रियता आहे, हे माहित आहे.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.