Manasvi Choudhary
केस गळणे आणि केस तुटण्याच्या समस्या महिलांसह पुरूषांना देखील होत आहे. बदलेली जीवनशैली, अयोग्य आहार, प्रदूषण आणि धूळ यामुळे केस खराब होतात.
केस तुटल्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि केसांती कोरडेपणा वाढू लागतो यामुळे केसांची वेळीच काळजी घेणे महत्वाचे आहे.
रोझमेरी तेल हे केसांच्या वाढीसाठी उपयोगी आहे. खोबरेल तेलामध्ये रोझमेरी तेल मिक्स करून ते केसांना लावावे.
जर तुम्हाला रोज तेल लावायचे नसेल, तर पाण्यात रोझमेरीची पाने उकळून ते पाणी थंड झाल्यावर स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि रोज मुळांना स्प्रे करा.
कोरफड केसांसाठी नॅचरल काम करते. केसांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी केसांना धुण्यापूर्वी कोरफड लावा.
केसांचा पोत सुधारण्यासाठी केसांना एरंडेल तेल लावून त्याची वेणी बांधून ठेवा. केस धुण्यापूर्वी तुम्ही केसांना तेल लावू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.