Manasvi Choudhary
उचकी लागणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र उचकी लागल्यानंतर ती थांबवण्यासाठी काय करावे असा प्रश्न सर्वानाच असतो.
उचकी लागल्यानंतर तुम्ही घरीच काही सोपे उपाय करू शकता.
उचकी लागल्यानंतर तुम्ही एकाच घोट मध्ये थंड पाणी प्या. असं करून पाहा यामुळे उचकी थांबते.
१० ते १५ सेकंद श्वास रोखून घरा नंतर हळूहळू सोडा . असं २ ते ३ वेळा केल्याने उचकी थांबते.
जिभेवर साखर ठेवा आणि हळूहळू विरघळू द्या . साखरेच्या गोडव्यामुळे मेंदूला जाणारे उचकीचे सिग्लन थांबते.
जीभ शक्य तितकी बाहेर काढा यामुळे घशातील नसा उत्तेजित होतात आणि उचकी थांबते. असा प्रयोग करून पाहा
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.