Manasvi Choudhary
लग्नामध्ये तुम्हीला नॅचरल ग्लो हवा असेल तर लग्नाच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला काही घरगुती स्किनकेअर टिप्स फॉलो करायच्या आहेत.
कच्चे दूध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. कच्चा दुधाने चेहरा धुतल्यास नैसर्गिक ग्लो येईल. चेहरा उजळेल.
बाजारातील केमिकलयुक्त टोनर ऐवजी तुम्ही गुलाब पाण्याचा स्प्रे चेहऱ्यासाठी वापरा यामुळे चेहऱ्यावरील ओपन पोअर्स बंद होतात.
लग्नाच्या साधारण एक महिन्यापूर्वी जास्त गोड, तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे.
तांदळाचे पाण्यात दूध आणि मध मिक्स करून हे मिश्रण देखील चेहऱ्याला लावा यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
बेसन , हळद, मध आणि दही यांचे एकत्रित मिश्रण चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होईल.
तुम्ही घरात किंवा घराबाहेर असाल तेव्हा spf 30+ सनस्क्रिन लावा तसेच बाहेर जाताना चेहरा स्कार्फ किवा रूमालाने झाकून घ्या