Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील मसाल्यापैंकी एक म्हणजे काळी मिरी. काळी मिरी जेवणामध्ये हमखास वापरली जाते.
केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी नाहीतर, आरोग्यासाठीही काळी मिरीचे फायदे आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
काळी मिरी मेंदूसाठी फायदेशीर आहे. काळी मिरीमध्ये पाईपरिन असते ज्यामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. स्मरणशक्ती सुधारते.
काळी मिरीमध्ये असलेले संयुगे शरीरातील जळजळ, अॅलर्जी कमी करण्यास मदत करते.
हृदयाचे रोगापासून तसेच कर्करोगांपासून बचाव करण्यासाठी काळी मिरी खाल्ली जाते. काळी मिरीचे पाणी प्यायले जाते.
काळी मिरी खाल्ल्याने शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत काळी मिरी पावडर घेतल्यास सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण मिळते.