Manasvi Choudhary
केसांच्या सौंदर्य टिकवण्यासाठी हेअर मास्क अत्यंत महत्वाचे आहे.
जर तुम्हाला गुडघ्यापर्यंत लांब आणि घनदाट केस हवे असतील, तर केवळ वरून तेल लावणे पुरेसे नाही; मुळांना पोषण मिळणे गरजेचे आहे.
केसांच्या वाढीसाठी तुम्ही घरगुती हेअर मास्क घरीच सहज बनवू शकता.
कांद्याचा रस, कढीपत्ता पेस्ट आणि नारळाचे तेल मिक्स करून तुम्ही केसांच्या मुळांना लावा.
मेथी दाणे पेस्ट आणि दही याचं एकत्रित मिश्रण तुम्ही केसांना लावा यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.
कोरफड आणि मध हे मिश्रण एकत्रित करून ओल्या केसांवर लावा यामुळे केस हायड्रेट होतात आणि नैसर्गिकरित्या वाढतात.
हा मास्क केसांच्या मुळांना लावा आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा यामुळे केसांची वाढ होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.