Salaar Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaar Movie: प्रभाससाठी तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय, मध्यरात्री १ आणि पहाटे ४ वाजता होणार 'सालार'चा शो

Salaar Movie Show At 1 Am And 4 Am: तेलंगणातील प्रभासच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. प्रभासच्या सालारसाठी तेलंगणा सरकारने (Telangana Government) मोठा निर्णय घेतला आहे.

Priya More

Prabhas Salaar Movie:

साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) लवकरच त्याचा बहुप्रतीक्षित 'सालार पार्ट 1: सीझफायर' (Salaar Movei) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सालारची सगळीकडे चर्चा सुरू आहे. 22 डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रभासचे चाहते या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटासाठी प्रभासच्या चाहत्यांना आणखी एक दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. अशामध्ये तेलंगणातील प्रभासच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. प्रभासच्या सालारसाठी तेलंगणा सरकारने (Telangana Government) मोठा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सालार' चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंडला मध्यरात्री 1 आणि पहाटे 4 वाजता शो होणार आहेत. या प्लानिंगला तेलंगणा सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यासंदर्भात तेलंगणा सरकारने निवेदन देखील जारी केले आहे. ज्यामध्ये सरकारने ही गोष्ट नमूद केली आहे की, राज्यात मध्यरात्री 1 वाजताच्या सालार चित्रपटाच्या शोला मंजूरी देण्यात आली आहे.

तेलंगणा सरकारने फक्त या चित्रपटाच्या लवकर स्क्रिनिंगला परवानगी दिली नाही तर त्यासोबतच निर्मात्यांना मल्टिप्लेक्समधील तिकिटांच्या किंमती 100 रुपयांपेक्षा जास्त वाढवण्यास सांगण्यात आले आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, तेलंगणा राज्यात 22 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता 'सालार' चित्रपटाच्या 6 शोसाठी परवानगी दिली जात आहे. शिवाय त्याचे दरही वाढत आहेत. सिंगल स्क्रीनमध्ये 65 रुपये आणि मल्टिप्लेक्समध्ये 100 रुपयांची वाढ होणार आहे.'

तेलंगणा सरकारने 22 डिसेंबरला काही चित्रपटगृहांमध्ये मध्यरात्री 1 वाजताचा शो दाखवण्यास देखील परवानगी दिली आहे. Sacnik नुसार, या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये अवघ्या दोन दिवसांत 5,77,406 तिकिटे विकून 12.67 कोटींची कमाई केली आहे. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून दमदार कमाई केली आहे. येत्या काळात या चित्रपटाच्या कमाईचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे. अशामध्ये प्रभासचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करेल असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT