Tejasswi Prakash On Marriage Plans Instagram @tejasswiprakash
मनोरंजन बातम्या

Tejasswi Prakash On Marriage Plans : तेजस्वी प्रकाश - करण कुंद्रा लग्न कधी ? अभिनेत्रीने केला खुलासा

Tejasswi Prakash - Karan Kundrra: तेजस्वी आणि कारण कधी लग्न करणार हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या चाहतेही उत्सुक आहेत.

Pooja Dange

Tejasswi Prakash Spoke About Marriage Plan : करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध आहे. बिग बॉस 15 च्या घरात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हापासून ते प्रेक्षकांना खूप आवडतात. तेजस्वी आणि कारण कधी लग्न करणार हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या चाहतेही उत्सुक आहेत. पण या दोघांचे लग्न पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, तेजस्वी प्रकाशने बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत तिच्या लग्नाच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे. तेजस्वी म्हणाली सध्या लग्नाचे कोणतेही प्रेशर नाही. “मला आणि करणला आमच्या लग्नाबद्दल बरेच प्रश्न पडतात. (Latest Entertainment News)

करणला हे समजते की मी माझ्या व्यावसायिक जीवनात एका विशिष्ट जागेवर आहे आणि जेव्हा मला वाटेल की मी तयार आहे तेव्हाच तो लग्न करेल. त्याला आयुष्यात काय हवे आहे हे त्याला ठाऊक आहे आणि आपण आपल्या नात्यात तसे खूप सुरक्षित आहोत. त्यामुळे कोणताही दबाव नाही,” असे तेजस्विनीने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

तेजस्वी प्रकाशने तिच्या लग्नाविषयी बोलायची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तेजस्वीने त्यांच्या लग्नाविषयी सांगितले होते की, तिला तिच्या लग्नाचा प्लॅन 'गुप्त' ठेवायचा आहे आणि तो प्लॅन प्रत्यक्षात येईपर्यंत त्याबद्दल बोलू इच्छित नाही. लग्न करणं तिच्यासाठी 'खूप महत्त्वाचं' असल्याचंही तिनं मान्य केलं.

"मी प्रेमात आहे. मी थोडी अंधश्रद्धाळू आहे. मला असे वाटते की मी याबद्दल जितके जास्त बोलतो तितके लोक तुमच्या आयुष्यातील सुंदर गोष्टींपासून दूर जातात. त्यामुळे लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

ते प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत मला त्याबद्दल बोलायला आवडणार वाटत नाही. मला ते गुप्त ठेवायचे आहे. आम्ही स्टँग आहोत आणि मी एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहे,” तेजस्वीने झूम टीव्हीला सांगितले होते.

तेजस्वी प्रकाश सध्या एकता कपूरच्या फॅन्टसी शो, नागिन 6 मध्ये मुख्य भूमिका करत आहे. अलीकडे, वत्सल शेठ देखील या शोमध्ये सहभागी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beautiful Railway Station: देशातील ९ ऐतिहासिक आणि आकर्षक रेल्वे स्थानके, पर्यटकांसाठी आहेत खूप खास

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

SCROLL FOR NEXT