Man Kasturi Re Saam Tv
मनोरंजन बातम्या

Man Kasturi Re: 'या' दिवशी प्रदर्शित होणार तेजस्वी प्रकाशचा मराठी सिनेमा

या चित्रपटात अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस (Big Boss) 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या लॉन्चबद्दल खूप उत्सुक आहे. ही अभिनेत्री सध्या एकता कपूरच्या नागिन 6 या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ती लवकरच 'मन कस्तुरी रे' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाच्या रिलीज डेटसह चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित केले आहे. या अभिनेत्रीसोबत अभिनेता अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तेजस्वीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये ती स्कूटी चालवताना दिसत आहे तर अभिनव स्कूटीचा तोल सांभाळताना दिसत आहे, जो तिच्या मागे बसलेला दिसत आहे.

हे देखील पाहा -

अभिनेत्री करण कुंद्रासोबतच्या आपल्या नात्यामुळे प्रचंड चर्चेत असते. तेजस्वी जरी हिंदी पडदा गाजवत असली तरी ती एक मराठी मुलगी आहे. आता तेजस्वी मराठीत दमदार पदार्पण करत आहे. तेजस्वीच्या चाहत्यांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता होती. आता प्रेक्षकांची ती प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

तेजस्वी प्रकाश मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डेचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत झळकणार आहे. अभिनय हा एक प्रसिद्ध स्टारकीड असूनसुद्धा त्याने आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. अभिनयने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करत, या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, तेजस्वी आणखी एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट देखील लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तेजस्वी प्रकाशने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्स या विषयांमध्ये अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर ती अभिनयाकडे वळली होती. तेजस्वी प्रकाशने वयाच्या 18 व्या वर्षी करिअरची सुरूवात केली होती. या अभिनेत्रीने संस्कार धरोहर अपनों की, स्वरागिनी , पहरेदार पिया की व 'सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या ती 'नागिन' या मालीकेमध्ये काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

SCROLL FOR NEXT