Tejashri Pradhaan News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tejashri Pradhaan News: काय सांगता..! तेजश्रीच्या डोक्यावर अक्षता पडणार.. शुभमंगल होणार..

Hashtag Tadev Lagnam Tejashri Pradhaan New Film: महाराष्ट्राची लाडकी सुन म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेली तेजश्री प्रधान सध्या लग्नामुळे चर्चेत आहे.

Chetan Bodke

Hashtag Tadev Lagnam Mhuruta: महाराष्ट्राची लाडकी सुन म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेली तेजश्री प्रधान सध्या लग्नामुळे चर्चेत आहे. तेजश्री लवकरच रियल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये लग्न करणार आहे. सध्या अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असून अशातच आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शुभम फिल्म प्रॉडक्शन निर्मित, आनंद गोखले दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हा कौटुंबिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला असून या चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

नावावरूनच हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणारा दिसतोय. मात्र या चित्रपटात काय पाहायला मिळणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल. शेखर मते निर्मित या चित्रपटाची कथा आणि पटकथा आनंद दिलीप गोखले यांचीच आहे. या चित्रपटासाठी मंदार चोळकर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीतलेखन केलं आहे तर पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. (Entertainment News)

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “नुकतीच आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली असून सध्या चित्रपटाबद्दलच्या अनेक गोष्टी पडद्याआड आहेत. लग्नसंस्थेवर आधारित जरी हा चित्रपट असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. एका परिपक्व नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारी ही कथा आहे. यापूर्वी असा विषय क्वचितच कोणी हाताळला असेल. हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक आणि सहकुटुंब बघावा, असा हा सिनेमा असून लवकरच हा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. सिनेमात अनेक नामांकित कलाकार आहेत.” (Marathi Film)

तर निर्माते शेखर मते म्हणतात, “हा विषय मला ऐकता क्षणीच भावाला आणि त्वरित या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना हा विषय निश्चितच आवडेल.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT