Tmkoc Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tmkoc Show: जेठालालचं भांडण पेटलं, निर्मात्याची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमकी

Dilip Joshi Exit From Tmkoc Show: दिलीप जोशी हे देखील मालिका सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Manasvi Choudhary

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात त्याचं अनोखं स्थान निर्माण केलं आहे. अशातच मागील अनेक दिवसांपासून मालिकेतील कलाकार शोला रामराम करत आहेत. अशातच माहितीनुसार, दिलीप जोशी हे देखील मालिका सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, मालिकेतील दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात वाद झाला. यांचा वाद इतका टोकाला पोहचला की दोघांच्यात हाणामारी देखील झाली. यानंतर दिलीप जोशी यांनी मालिका सोडणार असल्याचं म्हटलं आहे. रिपोर्टनुसार, ऑगस्ट महिन्यात दिलीप जोशी आणि असीत मोदी यांच्यात भांडण झाले होते. सुट्ट्यांवरून त्यांच्यात भांडणाला सुरूवात झाली होती. दिलीप यांनी असित यांच्याशी बोलायचे म्हटंले होते. मात्र असित हे बोलण्यासाठी टाळाटाळ करायचे. यामुळेच दिलीप जोशी हे संतापले.

दरम्यान, कुश शाहचा शुटिंगचा शेवटचा दिवस होता . यावेळी दिलीप जोशी हे असित मोदी यांची वाट पाहत होते. कारण त्यांनी सुट्ट्याविषयी असित मोदी यांच्याशी बोलायचे होते. पण ते आले आणि थेट कुशला भेटायला गेले. यावरूनच त्याच्यांत बाचाबाची सुरू झाल्याची माहिती आहे. पुढे हे भांडण एवढे वाढले की यांच्यात हाणामारी सुरू झाली. दिलीप जोशी यांनी त्यांची कॉलर पकडली आणि पुढे शो सोडण्याची धमकीही दिली असल्याच बोललं जात आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा गेली १६ वर्षापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राचे प्रेक्षकांशी घट्ट नातं आहे. मालिकेत दिलीज जोशी हे जेठालाल चंपकलाल गडा यांच्या मुख्य भूमिकेत आहे. मालिकेतील अनेक कलाकार तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा निरोप घेतला आहे.यामुळेच जेठालाल आता शो सोडणार असल्याचं बोललं जात असताना नेमकं जेठालाल यांच्या जागी कोण येणार? मालिकेत नेमकं काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. असे असताना मालिकेचे निर्माते तसेच दिलीप जोशी यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT