Tarak Mehta; का उल्टा चश्मा' फेम नट्टू काका अभिनेता घनाश्याम नायक यांचं निधन Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tarak Mehta; का उल्टा चश्मा' फेम नट्टू काका अभिनेता घनाश्याम नायक यांचं निधन

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमधील सर्वांचे लाडके नट्टू काका अर्थात अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमधील सर्वांचे लाडके नट्टू काका अर्थात अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. निर्माते असित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांचे निधन झाल्याचे सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून घनश्याम नायक यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. घनश्याम यांच्यावर काही महिन्यांअगोदर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

हे देखील पहा-

मागील ५० हून अधिक वर्षांपासून घनश्याम नायक प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. त्यांची खरी ओळख आणि प्रसिद्धी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं दिली होती. या मालिकेतून ते घराघरात पोहोचले होते. नट्टू काका या पात्राला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले आहे. नट्टू काका हे या मालिकेच्या सुरुवातीपासून जोडले होते. त्यांची एक विनोदी शैली, त्यांचे संवाद प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडायचे.

नट्टू काका यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्यासोबतच्या आठणींना उजाळा देखील दिला आहे. काही दिवसांअगोदर त्यांनी एका मुलाखतीत शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. 'मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि चेहऱ्यावर मेकअप असताना अखेरचा श्वास घ्यायचा आहे. माझी ही इच्छा देवाने पूर्ण केली पाहिजे', असे ते भावूक होऊन म्हणाले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

Pragya Singh Thakur : मालेगाव प्रकरणात नरेंद्र मोदींचं नाव घेण्यासाठी टॉर्चर केलं; प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

SCROLL FOR NEXT