Tapovan Tree Cutting Saam tv
मनोरंजन बातम्या

Tapovan Tree Cutting: 'आमच्या तपोवनाला हात लावू नये...'; नाशिक तपोवन वृक्षतोडीविरोधात मराठी कलाकारांचा संताप

Tapovan Tree Cutting: नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीविरोधात मराठी कलाविश्व, नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आवाज उठवला आहे. अनिता दाते, चिन्मय उदगीरकर, सयाजी शिंदे यांसारख्या कलाकारांनी ‘तपोवन वाचवा’ मोहिमेत सहभाग घेतला आहे.

Shruti Vilas Kadam

Tapovan Tree Cutting: नाशिकच्या तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून, या आंदोलनाला मराठी कलाविश्व, नागरिक आणि अगदी शाळकरी विद्यार्थ्यांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. निसर्गाचा जीवनदायी समतोल मोडणाऱ्या या वृक्षतोडीविरोधात नागरिक दीर्घकाळापासून आंदोलन करत आहेत. मात्र आता कलाकारांच्या सहभागामुळे या संघर्षाला अधिक जोम मिळाला आहे. सयाजी शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर अभिनेत्री अनिता दाते आणि अभिनेता चिन्मय उदगीरक यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे.

कलाविश्वाचा आक्रमक पाठींबा

कलाकार अनिता दाते यांनी तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आवाज उठवला आणि प्रशासनाला पर्यावरणाच्या संरक्षणाची जाणीव करून दिली. अनिता दाते म्हणाली, पर्यावरण प्रेमी, पर्यावरण अभ्यासक यांना एकत्र घेऊन अधिक अधिक उत्तम पर्याय काढावे. पण, आमच्या तपोवनाला हात लावू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. अनिता सह अभिनेता चिन्मय उदगीरकर यांनीही मैदानात उतरून तपोवन रक्षणाची आग्रही मागणी केली. चिन्मय उदगीरकर स्पष्ट म्हणाला, “तपोवन वाचवा तपोवन वाढवा हा आमचा नारा आहे. मुख्यमंत्री सुवर्ण मध्य काढतील, पण 1800 झाडे वाचलीच पाहिजेत. गोदावरीचा प्रवाह वाढवणे देखील तितकेच आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झाली पाहिजे, लावलेली झाडे किमान 3 वर्षे जिवंत राहतील याची हमी प्रशासनाने द्यावी.”

कलाकारांचा मोठा जमाव

अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेत्री अनिता दाते, अभिनेता चिन्मय उदगीरकर, तसेच नाटक, चित्रपट, संगीत आणि कला क्षेत्रातील अनेक मराठी कलाकारांनी तपोवनात एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन केले. त्यांनी घोषणाबाजी, पर्यावरण विषयक गाणी, ढोल-ताशे आणि कलात्मक सादरीकरणाद्वारे तपोवन रक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला. कलाकारांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

शाळकरी मुलांचा सहभाग

या आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आता शाळकरी मुलंही हातात वृक्षतोडीविरोधी फलक हाती घेऊन आंदोलनात उतरली आहेत. “Save Tapovan”, “Save Trees”, “No More Cutting” अशी घोषवाक्ये घेऊन मुलांनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लहान मुलांचा हा सहभाग पर्यावरण रक्षणाच्या भविष्यासाठी आशादायी ठरत आहे आणि प्रशासनावर अधिक दडपणही निर्माण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EXIT POLL मध्ये महायुतीची सरशी; अंदाज जाहीर होताच रंगली राज ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या भविष्यवाणीची चर्चा

Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

SCROLL FOR NEXT