Tanya Pardazi, 21-year-old TikToker  Tanya Pardazi Instagram
मनोरंजन बातम्या

Tanya Pardazi | हजारो फूटांवरुन उडी मारली, पण पॅराशुट उघडलंच नाही; २१ वर्षीय टिकटॉक स्टार तान्या परदाजीचं निधन

Tanya Pardazi, 21-year-old TikToker: टिकटॉक स्टार तान्या परदाजी हिचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन झाले आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Tanya Pardazi: टिकटॉक स्टार तान्या परदाजी (Tanya Pardazi) हिचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन झाले आहे. स्कायडायव्हिंग (skydiving) करताना झालेल्या अपघातात तिला जीव गमवावा (Death) लागला आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग होता. तिने मिस कॅनडा स्पर्धेतही उपांत्य फेरी गाठली होती. टिक टॉकवर (TikTok Star) तिचे सुमारे एक लाख फॉलोअर्स होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोलो स्कायडायव्हिंग दरम्यान तिचे पॅराशूट उघडलेच नाही, ज्यामुळे जमिनीवर पडून तिचा मृत्यू झाला. (Tanya Pardazi dies in skydiving accident)

हे देखील पाहा -

तान्या परदाजी कोण होती?

तान्या परदाजी ही कॅनडातील टिकटॉकर आणि ब्युटी क्वीन होती. तिच्या Tik Tok प्रोफाइलला सध्या 95.4K फॉलोअर्स आहेत ज्यात २ दशलक्षाहून अधिक लाईक्स आहेत. ती टोरंटो विद्यापीठात तत्त्वज्ञानाची विद्यार्थिनी होती. ती विद्यापीठाच्या चीअरलीडिंग टीमचा देखील एक भाग होती. तिच्या अकाली निधनानंतर विद्यापीठाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तान्या परदाजीने २०१७ मध्ये मिस कॅनडा सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती.

शेवटच्या व्हिडिओमध्ये काय म्हणाली होती तान्या परदाजी

तिच्या टिकटॉक अकाउंटवर तिने अनेकवेळा मानसशास्त्र, एलियन, कला इतिहासाशी संबंधित व्हिडिओ शेअर केले आहेत. २२ ऑगस्टला तिने तिचा शेवटचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती एक कोडे सोडवताना दिसली. व्हिडिओच्या सुरुवातीला तान्याने असेही सांगितले की, ती काही दिवसांपूर्वी स्कायडायव्हिंगला गेली होती.

या कारणामुळे झाला अपघात

तान्याला स्कायडायव्हिंगची () खूप आवड होती. २७ ऑगस्टला रोजी ती एकट्यानेच स्कायडायव्हिंगसाठी गेली होती, पण ती तिच्यासाठी धोकादायक ठरली. यादरम्यान तिचे पॅराशूट न उघडल्याने ती थेट जमिनीवर आदळल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT