Tanya Mittal: बिग बॉस १९ च्या घरात प्रवेश करताच तान्या मित्तल चर्चेत आली. स्वतःला करोडपती म्हणवणारी तान्या १५० बॉडीगार्ड, ८०० कर्मचारी आणि ग्वाल्हेरमध्ये ७ स्टार हॉटेलसारखे घर असल्याचा दावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या तान्याने जवळजवळ सहा वर्षांपूर्वी मिस एशियाचा किताब जिंकला. एका जुन्या TEDx टॉक व्हिडिओमध्ये, तान्याने तिच्या यशाचे रहस्य आणि तिला करोडपती बनवणाऱ्या लोकांबद्दल सांगितले.
तान्याने तिचा प्रवास सांगताना म्हटले, "मी शाळा आणि कॉलेजमध्ये असताना, मी वर्गातील सुंदर मुलगी नव्हते. माझे कोणी मित्र नव्हते कारण शाळेनंतर मी झोपडपट्टीतील मुलांसोबत वेळ घालवत असे आणि त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकत असे. मी अनेक अभ्यासक्रम शिकले आणि आज मी ५३ हस्तकलांमध्ये पारंगत आहे."
तिच्या व्यवसायाबद्दल बोलताना तान्या म्हणाली, “जेव्हा मी हँडमेड लव्ह (तिची गिफ्ट कंपनी) सुरू केली, तेव्हा मला जाणवले की लोकांमधील एक समस्या म्हणजे ते एकमेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकत नाहीत. त्यांच्यात खूप दुःख आहे. जेव्हा मी माझा व्यवसाय सुरू केला तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला. मी अशा तरुणांना टार्गेट केले जे रिलेशनशिपमध्ये होते. या तरुण जोडप्यांनी मला फक्त दोन वर्षांत देशातील करोडपतींपैकी एक बनवले.”
तान्याने तिच्या प्रॉफिटचा मार्जिन देखील शेअर केले आणि म्हणाली, “हँडमेड लव्हमध्ये मी माचिस विकते. हे माझे स्टार उत्पादन आहे कारण ते मला सर्वाधिक नफा देते. एका माचिसची किंमत १ रुपया आहे, पण मी ते ६५ रुपयांना विकते कारण मी या कलाकृतीत मास्टर आहे. मी त्यावर हँडमेड आर्ट तयार करते आणि मला माझ्या कल्पनांसाठी ६४ रुपये मिळतात. हा ९९% नफा आहे. माझ्या कंपनीत कोणतेही कर्मचारी नव्हते. मी सर्व काही एकटीने केले. ६ महिन्यांतच, माझे संपूर्ण भारतात जवळजवळ २०,००० ग्राहक झाले.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.