Tanaji Galgunde Saam TV
मनोरंजन बातम्या

Tanaji Galgunde : सैराट फेम 'लंगड्या'वर पार पडली शस्त्रक्रिया; जाणून घ्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Ruchika Jadhav

'सैराट' फेम लंगड्या तानाजी गळगुंडे याला मागील अनेक दिवसांपासून अँपेंडिक्सचा त्रास होता. त्याचा त्रास सध्या जास्त वाढल्याने सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्याच्यावर अँपेंडिक्सची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.

तानाजीने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजताच चाहते देखील चिंतेत होते. मात्र आता चिंता करण्याची गरज नसून आपला सर्वांचा लाडका लंगड्या सुखरूप आहे. उपचारानंतर सध्या तो आराम करत आहे.

तानाजी गळगुंडेने आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप सोडली आहे. सैराट या चित्रपटाने राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक व्यक्ती त्याला ओळखू लागली आहे. आपल्या चाहत्यांसाठी तो कायम सोशल मीडियावर अॅक्टीव असतो. त्याला गेल्या अनेक वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होता. नुकतेच त्याला अँपेंडिक्स असल्याचे निदान झाले.

तेव्हा अँपेंडिक्सची गाठ ही ४-५ सेंटिमीटरची असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. मात्र तेव्हा काही कारणास्तव तानाजीने ऑपरेशन करणे टाळले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याचा त्रास जास्त वाढला. पोटात त्याला असह्य वेदना होऊ लागल्या त्यामुळे त्याने याबाबत डॉ.अमेय ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तो थेट शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. डॉ.अमेय ठाकूर,डॉ.आलिशा माथूर,डॉ.सागर पारगुंडे,डॉ.आडके यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली.

लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल तानाजीचं मत काय?

एका मुलाखतीमध्ये तानाजीने लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं. त्याच्या या प्रतिक्रियेमुळे काही महिन्यांपूर्वी तो चांगलाच चर्चेत आला होता. " मी फार वेगळ्या विचारांचा आहे. मला लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिप जास्त चांगलं वाटतं. लग्नामध्ये जास्तीचा खर्च करण्यापेक्षा तुम्ही कमी खर्चात रजिस्टर पद्धतीने लग्न करावं.", असं तो म्हणाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : मेष ते मीन, सप्टेंबरचा शेवटचा दिवस तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलाय? वाचा आजचे राशीभविष्य...

Rashi Bhavishya : सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Satellite Internet: सिमकार्डविना मिळणार नेटवर्क? आकाशातून उतरणार 'सॅटेलाइट इंटरनेट', जाणून घ्या संपूर्ण माहिती

CM Eknath Shinde: ...अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील टीकेला CM शिंदेंनी दिलं जशास तसे उत्तर

SCROLL FOR NEXT