Tamannah Bhatiya 18 Years Old Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Tamannah Bhatiya Video: तमन्ना भाटियाचा १८ वर्षे जुना व्हिडीओ पाहिला का?; अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटकऱ्यांनी दिली भन्नाट प्रतिक्रिया

Tamannah Bhatiya Viral Video: सध्या तमन्ना भाटियाचा १८ वर्ष जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Tamannah Bhatiya 18 Years Old Viral Video

तमन्ना भाटिया एक टॉलिवूड सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री. कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणारी तमन्ना सध्या एका जुन्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या तमन्नाचा सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या तिच्या १८ वर्ष जुन्या व्हिडीओतला लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिजित सावंतच्या ‘लफ्जो में’ या गाण्याच्या माध्यमातून तमन्नाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पण तिला तिच्या तेराव्या वर्षीच पहिला चित्रपट मिळाला होता, ही बाब अनेकांना माहित नाही. तिच्या त्या पहिल्या चित्रपटाची जेव्हा शुटिंग झाली त्यावेळी ती दहावीला होती. जेव्हा तिला तो चित्रपट मिळाला तेव्हा ती अवघी १३ वर्षांचीच होती. अशी माहिती तिने स्वत: एका मुलाखतीत दिली आहे. अभिनेत्रीची ती मुलाखत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिनेत्रीचा हा दहावीला असतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या थ्रोबॅक व्हिडीओत तिने कोणत्या इयत्तेत शिकतेय?, तिने फिल्म इंडस्ट्रित डेब्यु कसं केलं? या विषयावर भाष्य करताना दिसते. तिचा हा लूक पाहून अनेक युजर्सने कमेंट केली आहे. अनेकांच्या मते, ती आजही पूर्वीसारखीच दिसते. तर अनेकांच्या मते, ती बिल्कुल किशोरवयीन दिसत नाही, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

“मी जेव्हा पिक्चर साईन केला तेव्हा साडे तेरा वर्षांची होते. मी सध्या शाळेत शिकतेय. २००५ मध्ये माझे दहावीचे शिक्षण पूर्ण होईल. सध्या मी दहावीचा अभ्यास करते.” असं तमन्ना व्हिडीओमध्ये म्हणाली. तमन्नाला या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

नुकताच तमन्नाचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने जगभरात १००० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. तिने आपल्या सिनेकारकिर्दित तेलुगू, हिंदी आणि तमिळ या चित्रपटात काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT