'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या मालिकेत मिसेस रोशन सोधीची भूमिका साकारलेली प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल (Jennifer Mistry) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या वर्षी अभिनेत्रीने तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित मोदी यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. आता तिने ही केस जिंकली असली तरी निर्मात्याशी तिची लढाई अजून संपलेली नाही. जेनिफरने असित मोदी यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहेत. त्यासोतब तिने धरणे आंदोलनाला बसण्याचा इशारा दिला आहे.
जेनिफर मिस्त्रीने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की, कोर्टात ती जिंकली आणि असित मोदीला लाखो रुपयांचा दंड झाला तरीही ती खूश नाही. सुनावणीच्या ४० दिवसांनंतरही असित मोदीने आपल्याला दंड आणि पगार दिला नसल्याचा दावा तिने केला. आता जेनिफरने निर्माता असित मोदींना धमकी दिली आहे.
कायदेशीर लढाई जिंकल्यानंतरही जेनिफर मिस्त्री खूश नाही. अलीकडेच तिने असित मोदींवर आणखी एक आरोप केला. शनिवारी ती मुंबईतील पवई पोलिस ठाण्यात गेली होती. अभिनेत्रीने एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी करून म्हटले आहे की, टीएमकेओसीचे निर्माते असे म्हणत आहेत की मी असित मोदींविरुद्ध कोणताही खटला जिंकलेला नाही. त्यांनी असिद मोदींवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे असित मोदी अडचणीत आले आहेत.
जेनिफर मिस्त्री पुढे म्हणाली की, 'नीला फिल्म प्रॉडक्शनचे निर्माते म्हणत आहेत की मी एकही केस जिंकलेली नाही. ते म्हणत आहेत की मी काही निरुपयोगी महिलांच्या गटात गेले होते आणि तिथे मला असे सांगण्यात आले. त्यामुळे मला असे म्हणायचे आहे की तुमचा निर्माता, अशा महत्वाचे, एवढ्या मोठ्या निर्मात्याने स्त्रीचे ऐकण्यासाठी सर्व काही व्यर्थ सोडले. हे आश्चर्यकारक आहे.'
जेनिफर मिस्त्रीचे म्हणणे आहे की तिने निर्मात्यांविरुद्ध पुन्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाई न झाल्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर आंदोलन करणार आहे. जेनिफर म्हणाली, 'मी त्यांना अल्टिमेटम दिले की जर त्याने चार्जशीटचे काम त्वरीत केले नाही र मी काय करेन हे मला माहीत नाही. जेव्हा द्रौपदी मुर्मूजी इथे येत असतील तेव्हा मी धरणे आंदोलनाला बसू शकते.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.