Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत 'या' लोकप्रिय पात्राची होणार एन्ट्री?

मालिकेतील लोकप्रिय पात्रांनी शोला निरोप दिला असल्याच्या बातम्या समोर आल्या असताना पुन्हा एकदा नवीन माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मागील अनेक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. शोमधील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. अशातच चाहत्यांना मालिकेसंबधित जाणून घ्यायचं असतं. मागील काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत अनेक बदल झाले. मालिकेतील लोकप्रिय पात्रांनी शोला निरोप दिला असल्याच्या बातम्या समोर आल्या असताना पुन्हा एकदा नवीन माहिती समोर आली आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा : मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता शैलेश लोढा यांनी देखील शो सोडल्याच्या बातम्यांना चर्चा असताना चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शैलेश या मालिकेत पुन्हा नव्याने एन्ट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. मालिकेत शैलेश लोढा तारक मेहताची भूमिका साकारत होता. त्यादरम्यान निर्माते आणि शैलेश यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने शैलेश मालिकेत काम करणार नसल्याचे चर्चा रंगल्या होत्या मात्र आता शैलेश पुन्हा एकदा शोच्या दिग्दर्शकासोबत दिसला आहे.

शैलेश आणि दिग्दर्शकांसोबतच त्यांचे इतरही मित्र या फोटोत दिसत आहेत. या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. शैलेश यांना मालिकेत परत आणण्याची विनंती चाहत्यांकडून होत आहेत.

Edited By - Manasvi Choudhary

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेच्या वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

Tuljapur Tulja Bhavani Mandir : तुळजा भवानी मंदिराचा गाभारा पाडणार? मंदिर जीर्णोद्धावरुन तुळजापुरात राडा

Pune Crime: पैशांची मागणी, वारंवार शिवीगाळ; तरुणीचं डोकं फिरलं, रॉडने मारहाण करत तरुणाला संपवलं

SCROLL FOR NEXT