Tarak Mehta Ka Ooltah Chashma Show: तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तब्बल १५ वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. गेल्या काही वर्षापासून मालिकेतील दिशा वकानी, भव्य गांधी,शैलेश लोढा यासारंख्या लोकप्रिय कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला.अलिकडेच टप्पूच्या व्यक्तिरेखेत असणारा राज अनादकट ने देखील मालिकेला रामराम ठोकला आहे. मालिकेतील कलाकार सोडून गेल्यानंतर अनेक नवीन कलाकार त्याच्या व्यक्तिरेखेत आहे. परंतु मालिकेचे निर्माते दयाबेनचे पात्र शोधू शकले नाही. दयाबेनच्या व्यक्तिरेखेत असणाऱ्या दिशा वाकानीने २०१७ मध्ये मालिका सोडली आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका टिव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. २००८ पासून या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. शोमध्ये प्रत्येकाची व्यक्तिरेखा ही तितकीच प्रसिद्ध आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने त्याच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी ही तिच्या आवाजासाठी आणि दयाबेनच्या भूमिकेसाठी लोकप्रिय आहे. गेल्या ६ वर्षांपासून दयाबेन 'तारक मेहता'पासून दूर आहे. प्रेक्षकांनाही दयाबेनची उत्सुकता लागली आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील दयाबेनची चाहते वाट पाहत असताना मालिकेबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. शोचे निर्माते असित मोदी यांनीच सांगितले आहे की, "दिशा वाकाणीला दयाबेनच्या भूमिकेत मालिकेमध्ये यायचे नाही आणि ते तिच्यावर जबरदस्तीही करू शकत नाही. निर्माते नवीन दयाबेनच्या शोधात आहेत. मात्र, त्यांना दिशा वाकानीसारखी अभिनेत्री मिळू शकलेली नाही. अलीकडेच असित मोदींनी एका माध्यमांशी सवांद साधला होता त्यावेळी देखील त्यांनी सांगितले की, दिशा वाकानीची व्यक्तिरेखा शोधणे हे आमच्यासाठी मोठे आव्हानात्मक आहे.
असित मोदी म्हणाले, “दिशा वाकानीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तिची कामगिरी उत्कृष्ट आहे. आम्ही तिच्यासारख्या अभिनेत्रीच्या शोधात आहोत, जी आपल्या शैलीने लोकांना प्रभावित करू शकेल. कदाचित वेळ लागेल. पण दया बेन लवकरच सर्वांसमोर येईल.
दिशा माझ्या बहिणीसारखी आहे आणि ती तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तिला दोन मुले आहेत. यामुळे आम्ही कोणीही तिला जबरदस्ती करू शकत नाही मात्र माझी अशी इच्छा आहे की आमची ओरिजनल दया भाभी उर्फ दिशा वकानी परत यावी."
आजही तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचे चाहते दयाबेनची आठवण काढतात. या व्यक्तिरेखेसाठी नवीन चेहरा शोधणे सोपे नाही. याचा अर्थ मी घाबरलो असे नाही. मी घाबरत नाही. दिशाची जागा घेणे अशक्य आहे. तिचा अभिनय खूप चांगला होता, पण मी अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो तिच्या व्यक्तिमत्त्वाने सर्वांना आश्चर्यचकित करेल. थोडा वेळ लागेल, पण आम्हाला दयाबेन मिळेल."