Famous Actor Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Passes Away : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. अभिनेत्याविषयी जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले.

अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडीलांचे निधन झाले आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या टीव्ही मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दिशा वकानीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिशा वकानीचे वडील ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी (Bhim Vakani) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. दिशा वकानीच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही.

भीम वकानी कोण?

दिशा वकानीचे वडील भीम वकानी हे प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगभूमीवरून केली. त्यानंतर ते बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसले. त्यांनी आमिर खानच्या 'लगान' चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती. तसेच शाहरुख खानच्या 'स्वदेस' आणि माधुरी दीक्षितच्या 'लज्जा' या चित्रपटांमध्येही ते दिसले होते.

भीम वकानी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' चा भाग

भीम वकानी दिशा वकानीच्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतही दिसले होते. त्यांनी मालिकेत बाबुजी चंपकलालचा मित्र मावजी छेदाची भूमिका साकारली होती. भीम वकानी उत्कृष्ट अभिनेते, चित्रकार आणि दिग्दर्शकही होते. भीम वकानी यांच्या निधनाची बातमी समजताच कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर श्रद्धांजलि वाहिली आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.

दिशा वकानी सध्या प्रसिद्धीपासून दूर आहे. दिशा वकानी अभिनयापासून दूर आपल्या कुटुंबात रमली आहे. आई झाल्यानंतर दिशाने अभिनयातून ब्रेक घेतला. ती आपला सर्व वेळ आपल्या कुटुंबाला आणि मुलांना देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast Cancer Risk : झोपेची कमतरता, ताण आणि मांसाहारामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, ICMR चा धक्कादायक अहवाल समोर

Maharashtra News Live Update: शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचाही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार

Health Tips : भटक्या कुत्रा चावला? वेळ वाया घालवू नका; हे उपाय तातडीने करा

Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला

Currency note serial number: नोटांवरचा सिरीयल नंबर नेमका काय सांगतो? जाणून घ्या रहस्य

SCROLL FOR NEXT