Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: गोकुळधाम भूकंपाने हादरले, नेमके काय घडलंय?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीमध्ये नेहमीच काहीतरी विशेष होत असते. यावेळी गोकुळधाममध्ये भूकंप झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: 'तारक मेहता का उलट चश्मा' ही टीव्हीवरील सुप्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेत नेहमीच काहीतरी धम्माल पाहायला मिळते. यावेळी ही धम्माल जरा जास्तच आहे असे दिसते. यावेळी जे घडले ते गोकुळधाममध्ये कधीच घडले नव्हते. सोसायटी कंपाऊंडमध्ये दिसलेले हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले.

पोपटलालची छत्री हवेत उडाली. डॉ. हाथी पडले आणि संपूर्ण सोसायटीमध्ये भूकंप झाल्यासारखे वाटले, सोढीही घसरला आणि थेट जमिनीवर आदळला. मात्र हे सर्व गोकुळधाममध्ये अचानक का होत आहे?

खरं तर हे सर्व पावसामुळे घडले आहे. अतिवृष्टीमुळे सोसायटीच्या अंगणात सर्वत्र शेवाळ झाले आहे. त्यामुळे सर्वजण घसरून पडत आहेत. पोपटलाल आणि डॉ. हाथी हे सोसायटीचे सेक्रेटरी भिडेकडे याबाबत तक्रार करण्यासाठी जातात. (TV)

भिडेकडे जात असतानाच पोपटलालचा पाय घसरतो आणि त्यांची छत्री, टोपी आणि तो स्वत: हवेत उडून थेट जमिनीवर पडतो. डॉ. हाथी त्याला उचलायला जातात, त्यांचाही पाय घसरतो आणि तेही जमिनीवर पडतात. (Program)

डॉ. हाथी पडताच संपूर्ण गोकुळधाम सोसायटी हादरते. घरात बसलेल्या लोकांना भूकंप झाला असावा, असे वाटते म्हणून ते सुद्धा सोसायटी कंपाऊंडकडे धावतात. परंतु तिथे पोहोचताच मेहतासाहेब, सोढी, भिडे, अय्यर सगळेच एकामागून एक घसरून पडतात.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah new episode update

पोपटलाल, मेहता, अय्यर, सोढी, भिडे सगळे पडल्यावर उठून उभे राहतात. पण डॉ. हाथींना उठणे शक्य होत नाही. त्यांना जमिनीवरून उचलण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत आहे. सोढी सुद्धा त्यांना जमिनीवरून उचलण्याचा प्रयत्न करतो. पण डॉ. हाथींना उठवायला कोणाचा जमत नाही. डॉ. हाथी जमिनीवरून कसे उठतील.. हा मोठा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर येत्या एपिसोडमध्येच मिळेल. (Comedy)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT