Priya Ahuja Accuses TMKOC producer Asit Modi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priya Ahuja Allegations: ‘मी गरोदर होते आणि त्यांनी मला...’ रिटा रिपोर्टर फेम प्रिया अहुजाचे निर्माते मोदींवर गंभीर आरोप

Priya Ahuja Accuses TMKOC producer Asit Modi: जेनिफर मिस्त्रीने निर्मात्यांवर सातत्याने आरोप केल्यानंतर अशातच पुन्हा एकदा रिटा रिपोर्टरचे पात्र साकारणाऱ्या प्रिया अहुजानेही निर्मात्यांवर काही आरोप लावत मोठे खुलासे केले आहेत.

Chetan Bodke

TMKOC Producer In Trouble Again: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडले आहेत. मालिकेतील अनेक कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जेनिफर मिस्त्री शोच्या निर्मात्यांवर सातत्याने आरोप करताना दिसत आहे. तर मालिकेमध्ये बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदौरियाने निर्मात्यांवर काही आरोप केले होते, अशातच पुन्हा एकदा रिटा रिपोर्टरचे पात्र साकारणाऱ्या प्रिया अहुजानेही निर्मात्यांवर काही आरोप लावत मोठे खुलासे केले आहेत.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत प्रिया अहुजाने मालिकेचे माजी दिग्दर्शक दिग्दर्शक मालव राजदा यांच्याशी लग्न केल्यानंतर कशी परिस्थिती बदलली याबाबत अनेक खुलासे केले आहेत. अभिनेत्री म्हणते, “मालवासोबत लग्न झाल्यानंतर आणि गरोदर राहिल्यानंतर सेटवरील सर्वच वातावरण बदलले होते. मी बाळाला जन्म दिल्यानंतर मी मालिकेत परत येण्याबद्दल विचारले, त्यावेळी मला समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एक दिवशी सहज मी असित मोदींना मेसेज केला की, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यानंतर त्यांनी मला फोन केला. मी त्यांना म्हणाले, मला तुमच्यासोबत मालिकेतील रिटाच्या भूमिकेबद्दल बोलायचे आहे, यावर ते म्हणाले, आपण नंतर बोलू… त्यांनी फोन ठेवल्यानंतर मी खूप रडले. इतकी वर्ष मालिकेत काम करून मला जराही आदर नाही का? निर्मात्यांनी मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर न देता फोन ठेवला.”

मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदानेही काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. ते म्हणाले की, एकदाही संपूर्ण टीम इंडियन आयडॉल या कार्यक्रमामध्ये गेली होती, त्यावेळी निर्मात्यांसह कोणीच प्रियाला शोसाठी आमंत्रित केले नाही. या गोष्टीचा तिला साहजिकच वाईट वाटले होते. असित मोदींना मी कधीही प्रियाला कोणत्या सीनमध्ये घ्या असे सांगितलेलं नव्हतं, तरीही अनेकदा शोमध्ये रिटाची भूमिका जिथे आवश्यक होती, तिथे तिला कास्ट करण्यात आलं नव्हतं.

जेनिफरने मालिकेमध्ये जवळपसा १४ वर्ष काम करत असताना तिला कधीच कोणासोबत मी गैरवर्तन करताना पाहिले नाही. ती नेहमीच आपल्या कामासोबत प्रामाणिक होती. वेळेवर येऊन ती आपापलं काम करत होती. पण तिने निर्मात्यांवर केलेल्या आरोपांबाबत कोणतीही माहिती नसल्याचे मालव राजदा यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saptashrungi Gad : सप्तशृंगी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत गडावर खासगी वाहतूक बंद

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Rinku Rajguru: 'आवडतं तेच काम करं, आनंद नसेल तर...'; रिंकू राजगुरुला आई-वडिलांता मोलाचा सल्ला

Pune Water Cut : पुण्यात पाणीकपातीचं संकट! कोणत्या दिवशी कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

Mrunmayee Deshpande : मनवा अन् श्लोकची जबरदस्त केमिस्ट्री; मृण्मयी देशपांडेच्या 'मना'चे श्लोक' चित्रपटाचे पहिलं गाणं रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT