Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tarak Mehta Birthday: कधीकाळी चॅनेलही मिळत नव्हता, आज लोकप्रियतेच्या शिखरावर; खळखळून हसवणाऱ्या तारक मेहताच्या निर्मितीचा रंजक प्रवास

तब्बल 13 वर्षांपासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील अनेक कलाकार बदलले, अनेकजण सोडून गेले मात्र मालिकेची लोकप्रियता अबाधित राहिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tarak Mehta Ka Ooltah Chashma: हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे नाव घेतले जाते. तब्बल १३ वर्षांपासून ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील अनेक कलाकार बदलले, अनेकजण सोडून गेले मात्र मालिकेची लोकप्रियता अबाधित राहिली.

मात्र मनोरंजन विश्वाला खळखळून हसवणाऱ्या या मालिकेची सुरुवात कुठून झाली? कधी झाली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, जाणून घेवूया या लोकप्रिय मालिकेच्या निर्मितीची कहाणी.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOH) हा शो गुजरातचे ज्येष्ठ स्तंभलेखक तारक मेहता यांच्या 'दुनिया ने औंधा चष्मा' या स्तंभावर आधारित आहे. मात्र ही मालिका एका विचित्र योगायोगाने सुरू झाली. वास्तविक, या शोची कल्पना निर्माते असित मोदी यांना त्यांचे खास मित्र जतिन कनाकिया यांनी दिली होती. त्यांनीच असित मोदी यांची तारक मेहता यांच्या स्तंभाशी ओळख करून दिली. खुद्द असित मोदी यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

साधारण १९९५ सालची गोष्ट आहे. त्यावेळी स्तंभलेखक तारक मेहता मुंबईहून अहमदाबादला आले होते. 1997 मध्ये त्यांची भेट असित मोदी यांच्याशी झाली. दोघांनी 'दुनिया ने औंधा चष्मा' या स्तंभावर आधारित मालिका बनवण्याचा विचार केला आणि दोन वर्षे त्यांचे संभाषण चालू राहिले. खरं तर, त्या काळात स्तंभलेखक तारक मेहता देखील गोंधळले होते.

कारण सुरतमध्ये राहणारे त्यांचे खास मित्र महेश भाई वकील हे देखील स्तंभावर आधारित एक मालिका बनवण्याच्या तयारीत होते. त्याने एक-दोन एपिसोड्सही तयार केले होते. स्तंभलेखकाने महेश भाई वकील आणि असित मोदी यांच्यात एक बैठक आयोजित केली, ज्यामध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोवर एकमत झाले. तारक मेहता देश आणि समाजातील घडामोडी अनोख्या पद्धतीने पाहत असल्याने या शोचे नाव ठेवण्यात आले.

या मालिकेबाबत सर्व बाजूंनी एकमत होऊनही असित मोदींच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. वास्तविक त्यावेळी सर्व वाहिन्यांनी ही मालिका प्रसारित करण्यास नकार दिला होता. शेवटी SAB TV ने (TV) या मालिकेसाठी होकार दिला आणि 2009 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' कार्यक्रम सुरू झाला.

आतापर्यंत 2200 हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. 'जेठालाल' असो, 'दया', 'टप्पू' असो की 'चंपक लाल', या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात ओळख निर्माण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT