Aurangabad Crime : जैन मंदिरातील मूर्तीची हेराफेरी; पोलिसांनी ठोकल्या चोरट्यांना बेड्या

दोन किलो सोन्याची मूर्ती चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना यश
Aurangabad Theft News
Aurangabad Theft NewsSaam Tv
Published On

Aurangabad News : औरंगाबाद  (Aurangabad) जिल्ह्यातील कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी बदलली असल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. त्यानंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी तीन पदके स्थापन करून तपासणी सुरू केली होती. अखेर दोन किलो सोन्याची मूर्ती चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना यश आलंय. चोरट्यांकडून सोन्याची मूर्तीही परत मिळाली आहे. (Latest Maharashtra News)

Aurangabad Theft News
Kalicharan Maharaj : धर्मासाठी खून कारणं काहीही वाईट नाही; कालीचरण महाराजांचे वादग्रस्त विधान

अज्ञात चोरट्यांनी गाभाऱ्यातून दोन किलो वजनाची सोन्याची मूर्ती लंपास केली आणि त्याजागी पंचधातूची दुसरी दिसणारी मूर्ती बसविली होती. त्याजागी पंचधातूची हुबेहूब दिसणारी मूर्ती बसविली होती. हुबेहूब दिसणारी मूर्ती बसवल्याने मूर्तीची अदलाबदली नेमकी केव्हा झाली हे कुणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, मूर्तीच्या पायाजवळचा भाग पांढरा पडत चालल्याचे लक्षात आले. त्यातून त्यांनी मूर्ती बदलली गेल्याचा संशय व्यक्त केला आणि त्यानंतर मूर्तीचे परीक्षण करण्यात आले. (Tajya News)

Aurangabad Theft News
Paragliding Accident : ४०० फुटांवर गेल्यावर पॅराशूटचा बेल्ट तुटला अन्.., साताऱ्यातील तरुणासोबत घडली भयंकर घटना

तेव्हा या मूर्तीचे वजन करण्यात आले. खोटी मूर्ती 1 किलो 66 ग्राम भरली, तर मूळ सोन्याची मूर्ती दोन किलो 300 ग्राम वजनाची आल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी तीन पदके स्थापन करून तपासणी सुरू केली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींचा आधार घेऊन मूर्ती बदलून मूळ मूर्तीची चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com