Gurucharan Singh Missing Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehata Ka Ulta Chasma: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'सोढी' गेला कुठे?, 4 दिवसांपासून बेपत्ता

Actor Guruchara Singh Missing: मीडिया रिपोर्ट्समध्ये गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गुरुचरण सिंगच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

Priya More

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील (Taarak Mehata Ka Ulta Chasma) प्रसिद्ध अभिनेत्याशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. या शोमध्ये 'सोढी'ची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता झाला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गुरुचरण सिंगच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत अद्याप गुरुचरण सिंगच्या कुटुंबाकडून अधिकृत माहिती आली नाही.

'सोढी'च्या भूमिकेतून गुरुचरण सिंगला खरी ओळख मिळाली आणि तो घराघरात पोहचला. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शोमध्ये त्याने अनेक वर्षे काम केले आहे. आता 'टाइम्स नाऊ'च्या वृत्तात गुरुचरण सिंग बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. 2020 मध्ये त्याने तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सोडला होता. यानंतर तो दिल्लीला शिफ्ट झाला. हा शो सोडल्यानंतर त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते.

गुरुचरण सिंग 22 एप्रिल 2024 रोजी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाला होता. त्याने त्याच्या एका अभिनेत्री मैत्रिणीलाही याबाबत माहिती दिली होती. अशा परिस्थितीत अभिनेत्रीही त्यांना एअरपोर्टवर रिसीव्ह करण्यासाठी आली होती. पण गुरुचरण सिंग मुंबई एअरपोर्टवर आला नाही. अभिनेत्रीने बराच वेळ त्याची वाट पाहिली आणि नंतर ती घरी गेली. तिला वाटले की गुरुचरण सिंगचे फ्लाइट मिस झाले असावे. गुरुचरण सिंगचे मित्र त्याला कॉल करत होते. पण त्याचा फोन लागत नसल्याने त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

'ई-टाइम्स'ला २०२० मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये गुरुचरण सिंगने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो सोडल्याबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की, त्याच्या वडिलांवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याशिवाय वैयक्तिक आयुष्यातही काही गोष्टी घडत असतात. अशा परिस्थितीत तो शोमध्ये काम करू शकला नाही. त्याला या विषयावर फारसे बोलायचेही नव्हते. गुरुचरण सिंगने शो सोडल्यानंतर दोन कलाकारांनी 'सोढी'ची भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्वच्छ आणि निर्मळ मन! कचऱ्यात सापडले 10 लाख रुपये, काकूंनी जे केले ते ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान| VIDEO

Success Story: स्वप्नपूर्ती! अवघ्या २१ व्या वर्षी मिळवली अमेरिकेत २६ लाख पॅकेजची नोकरी; शेतकऱ्याच्या लेकाचा प्रवास वाचून डोळे पाणावतील

मध्य प्रदेशातील गुलाबी थंडी, गाव झोपेत अन् छापेमारीचा धडका, पुणे पोलिसांचे "ऑपरेशन उमरती" यशस्वी

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा,युरियासाठी शेतकऱ्यांच्या खत विक्री केंद्रावर रांगा

Mumbai Fire: झोपडपट्टीला भीषण आग, १५ झोपड्या जळून खाक|VIDEO

SCROLL FOR NEXT