Dilip Joshi Chair Thrown By Sohel Rehman Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dilip Joshi News : 'जेठालाल'चं झालं होतं कडाक्याचं भांडण, थेट खुर्चीच फेकून मारली होती; 'तारक मेहता...'च्या सेटवर नेमकं काय झालं होतं?

Dilip Joshi Chair Thrown By Sohel Rehman : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत रोशन भाभींची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने दिलीप जोशीसोबत घडलेला धक्कादायक किस्सा शेअर केलेला आहे.

Chetan Bodke

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमुळे अभिनेता दिलीप जोशीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. जेठालाल 'तारक मेहता का...' मालिकेमधील मुख्य पात्र आहे. या शोने प्रेक्षकांचे आजवर निखळ मनोरंजन केले आहे. शोमधील अनेक कलाकार सध्या मालिकेला सोडचिठ्ठी देत आहेत. अशातच मालिकेत रोशन भाभींची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने दिलीप जोशीसोबत घडलेला धक्कादायक किस्सा शेअर केलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने एक मुलाखत दिली त्या मुलाखतीत तिने हा किस्सा सांगितला आहे.

एकदा दिलीप जोशी आणि सीरियलचे ऑपरेशनल हेड यांच्यात वाद झाला होता. नेमका तो वाद काय झालाय ? हा किस्सा अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितला आहे. तिने मुलाखतीत सांगितले की, "एकदा दिलीप जोशी आणि सोहेल रहमानी यांचं भांडण झाले आहे. सोहेल रहमानी सीरियलचे ऑपरेशनल हेड आहेत. त्यांनी सेटवर असताना अभिनेत्यावर खुर्ची फेकून मारली होती. त्यांच्यात भांडण झाल्यानंतर दिलीप यांनी धमकी दिली की, जर शोमध्ये सोहेल राहिला तर मी मालिका सोडून देईल. त्यामुळे निर्मात्यांकडून साहिलला मालिकेच्या सेटवर २ वर्षांसाठी बंदी घातली होती. पण, काही वर्षांनंतर सोहेल शोमध्ये परतला."

अभिनेत्रीने पुढे मुलाखतीत खुलासा केला की, "सोहेल रहमानी फक्त दिलीप जोशीसोबतच असं वागले नाही तर इतर कलाकारांसोबतही ते चुकीच्या पद्धतीने वागत होते. त्यामुळे बाकीच्या कलाकारांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. सोहिल रहमानी माझ्यासोबतही गैरवर्तन करत असे. त्यांना समोरच्या व्यक्तीसोबत कसे बोलावे, याबद्दल जास्त माहिती नाही. दिलीप जोशीने सोहिल विरोधातील पुरावेही ठेवले आहेत. ही घटना घडल्यानंतर, जर सेटवर दिलीप जोशी यांच्यासोबत असे किस्से घडू शकतात, मग मालिकेतल्या इतर कलाकारांसोबत कोणता प्रकार घडेल ? याचा आम्ही सर्वच लोकं विचार करत होतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

SCROLL FOR NEXT