Taapsee Pannu Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taapsee Pannu: 'व्यवस्थित बोला... तुम्ही माझ्यावर का ओरडत आहात', पापाराझींवर भडकली तापसी पन्नू

पापाराझी देखील गप्प बसले नाहीत आणि त्यांनीही अभिनेत्रीला चोख प्रत्युत्तर दिले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड आणि स्पष्टवक्ते अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच असे काही घडले की तापसीचे पापाराझींसोबत वाद झाले. तापसीला पापाराझीचा राग आला आणि तिने त्यांना चांगलेच सुनावले. यानंतर पापाराझी देखील गप्प बसले नाहीत आणि त्यांनीही अभिनेत्रीला (Actress) चोख प्रत्युत्तर दिले.

हे देखील पाहा -

तापसी तिच्या आगामी 'दोबारा' चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. जो 19 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या संदर्भात नुकतीच तापसी मुंबईतील एका हॉटेलमध्ये पोहोचली जिथे तिचे पापाराझींसोबत वाद झाले. या संपूर्ण वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोक तापसीची खिल्ली उडवत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की तापसी हॉटेलमध्ये पोहोचताच पापाराझी तिचा फोटो क्लिक करण्यासाठी तिच्या मागे धावतो आणि तिला थांबायला सांगतो, पण तापसी थांबत नाही. पुढे जाऊन अभिनेत्री एका जागी थांबते आणि म्हणते, 'मला का ओरडत आहेस? यात माझी चूक काय? तू माझ्याशी नम्रपणे बोल.

यावर फोटोग्राफर म्हणतो, आम्ही तुमच्याशी नम्रपणे बोललो. आम्ही 4:30 पासून तुमच्यासाठी उभे आहोत. फोटोग्राफरचे म्हणणे ऐकून तापसी म्हणाली, माझ्याशी नीट बोला. मी माझे काम करत आहे. ज्या वेळी मला बोलावले होते, मी त्या वेळी आली आहे. तुम्ही माझ्याशी नम्रपणे बोला. सध्या कॅमेरा फक्त माझ्या बाजूला आहे, त्यामुळे फक्त माझा वाद दिसतोय. कॅमेरा तुमच्या बाजूला असता तर कळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरु होणार?

Garlic Water Benefits: लसणाचे पाणी ठरेल केस गळतीवर रामबाण उपाय

Vinod Tawde: विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई; पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

Solkadhi Recipe: सोलकढी कशी बनवावी? संपूर्ण रेसिपी सोबत फायदे आणि टिप्स

Maharashtra Political News : बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का; अधिकृत उमेदवाराचा मतदानाआधीच भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT