Sadhvi Prachi
Sadhvi Prachi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swara Bhaskar: ‘फ्रीज की सुटकेस’ स्वरा आणि फहादच्या फोटोवरुन साध्वी प्राची पुन्हा बरळल्या.. नेटकऱ्यांचा संताप अनावर

Chetan Bodke

Sadhvi Prachi: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असते. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या स्वराची सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा सुरु झाली आहे. तिने गेल्या महिन्यात सोशल मीडियावर समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदशी लग्न केल्याची माहिती दिली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

नुकतंच स्वराने दिल्लीत हळद-मेहेंदी, कव्वाली नाईट आणि रिसेप्शन सोहळ्याचं आयोजनही केलं. तेव्हापासून तिला सातत्याने ट्रोल केलं जात आहे. अशातच विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा स्वरावर निशाणा साधला.

नुकतेच स्वराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांसोबत काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेले फोटो कव्वाली नाइटमधील आहे. या फोटोमध्ये स्वरा आणि फहादने गडद हिरव्या रंगाचे ट्रॅडिशनल कपडे परिधान केले होते. स्वराने हा फोटो शेअर करत ‘हॅलो शौहर’ असं कॅप्शन देत चाहत्यांसोबत फोटो शेअर केला.

स्वराचं हेच ट्वीट रिट्वीट करत साध्वी प्राची यांनी ‘काही अंदाज? फ्रीज की सुटकेस’ असं ट्वीट केलं. पण साध्वी प्राची यांचं हे ट्वीट प्रेक्षकांना फारसं आवडलेलं नाही. त्यांच्या या ट्वीटच्या माध्यमातून युजर्सनी साध्वी प्राची यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांना ट्रोल केले. त्यांची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी साध्वी प्राची यांना जबरदस्त ट्रोल केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती उघड

Malshej Ghat Accident: मोठी बातमी! माळशेज घाटात भीषण अपघात; पती पत्नीसह चौघांचा मृत्यू

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

SCROLL FOR NEXT