Swara Bhasker Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swara Bhasker: 'मी राणी पद्मावतीला भित्री म्हटलं नाही...'; त्या प्रकरणावरून ट्रोल झालेल्या स्वरा भास्करचे स्पष्टीकरण

Swara Bhasker: ‘पद्मावत’मधील जौहरच्या दृश्यावर केलेल्या वक्तव्यामुळे ट्रोल झालेल्या स्वरा भास्करने स्पष्टीकरण दिले आहे. राणी पद्मावतीला कधीही भित्री म्हटले नसल्याचे तिने स्पष्ट केले.

Shruti Vilas Kadam

Swara Bhasker: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता संजय लीला भन्साळी यांच्या २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘जौहर’च्या सीनवर केलेल्या एका वक्तव्यामुळे स्वरा पुन्हा चर्चेत आली आहे. तिचा ‘जौहर’ विषयी मत मांडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी तिच्या विधानाला राणी पद्मावती आणि जौहर करणाऱ्या स्त्रियांचा अपमान असल्याचे म्हटले. मात्र, आता स्वराने स्वतः समोर येत या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले आहे.

स्वरा भास्करने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. तिने म्हटले आहे की, तिने कधीही राणी पद्मावती किंवा जौहर करणाऱ्या स्त्रीयांना भित्री म्हटले नाही. व्हिडिओमध्ये स्वरा म्हणते, 'माझी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिचा चुकीचा अनुवाद केला गेला आहे. मी कधीही असे म्हटले नाही की राणी पद्मावती किंवा इतर कोणतीही सती भित्री होती. माझ्यावर खोटा आरोप केला जात आहे. तुम्हाला माझी निंदा करायची असेल, तर करा, पण माझ्या मूळ वक्तव्याच्या आधारावर करा. बलात्कारानंतरही महिलांना जगण्याचा हक्क आहे.' हे मत मला मांडायचे होते.

स्वराने पुढे सांगितले की, 'कार्यक्रमात मला विचारण्यात आले की मी संजय लीला भन्साळी सरांना लिहिलेले पत्र कशाबद्दल होते. त्याला उत्तर देताना, मला नेमके काय वाटते हे मी स्पष्ट केले. आता माझ्या वक्तव्याचा चुकीचा अनुवाद केला जात आहे. मी असे म्हटले नाही की राणी पद्मावती आणि जौहर करणाऱ्या इतर महिला भित्र्या होत्या.'

स्वराने पुढे म्हणाली, चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहताना माझ्या मनात एकच विचार आला, 'देवा न करो, पण जर मी कधी बलात्काराची बळी ठरले, तर माझा जीव न संपवल्याबद्दल मी स्वतःला भित्रे वाटले असते का, असा विचार माझ्या मनात आला होता. आपण असे चित्रपट बनवायला हवेत का? जे असा संदेश देतात की स्त्रीची शारीरिक पवित्रता तिच्या आयुष्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे? बलात्कारातून वाचलेल्यांना असा संदेश द्यायला हवा का की, तिने मरायला हवं होतं आणि तिने जगणं ही एक वाईट गोष्ट आहे? स्त्रीच्या जगण्याच्या इच्छेला कधीही कमी लेखू नका.' असेती शेवटी म्हणाली.

दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी दिल्लीतील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे आयोजित ‘वुमन, लाईफ, फ्रीडम’ कार्यक्रमात स्वराने ‘पद्मावत’मधील जौहरच्या सीनवर भाष्य केले होते. त्यानंतर तिच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. ‘

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

High Court: आईपासून वेगळं हो, बायकोच्या हट्टाला नवऱ्याकडून नकार, शेवटी कोर्टानेच दिला मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक सामाजिक न्याय भवनावर चढले मराठा तरुण

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

Maratha bandh : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! बीडसह उद्या ४ जिल्हे कडकडीत बंद; काय सुरू आणि काय बंद? पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT