Swapnil Joshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi: ना अभिनय ना कोणती भूमिका; स्वप्नील जोशी येतोय नव्या रूपात

Swapnil Joshi: नाच गं घुमा चित्रपटाची निर्मिती करून आता पुन्हा एकदा स्वप्नील नव्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

Manasvi Choudhary

2024 हे वर्ष स्वप्नील जोशीसाठी खास ठरलं आहे. या वर्षात स्वप्नील जोशीने एक वेगळी भूमिका बजावली आणि त्याने अभिनयाच्या सोबतीने निर्मिती विश्वात पदार्पण केलं ! नाच गं घुमा चित्रपटाची निर्मिती करून आता पुन्हा एकदा स्वप्नील नव्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. आगामी " सुशीला सुजीत " या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी करणार आहे.

स्वप्नील च्या सोबतीने अभिनेता प्रसाद- मंजिरी ओक , संजय मेमाणे आणि निलेश राठी देखील या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. बडे कलाकार या चित्रपटासाठी निर्माते झाले असून आता या चित्रपटाची स्टार कास्ट काय असणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

चित्रपटाचा मुहूर्त देखील तितकाच खास ठरला आणि याच कारण देखील तेवढं खास आहे. आघाडीचा अभिनेता लेखक निर्माता जितेंद्र जोशी याने या चित्रपटाच्या मुहूर्तला खास हजेरी लावून चित्रपटाचा मुहूर्त खास केला आहे. जितेंद्र जोशी हा या सगळ्यां निर्मात्याचा लाडका मित्र तर आहे आणि म्हणून लाडक्या जवळच्या मित्राच्या हातून या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आहे.

दगडूशेठ गणतीच्या बाप्पाच दर्शन घेऊन या नव्या चित्रपटाचा श्री गणेशा झाला आहे. चित्रपटाची कथा काय असणार , कोण कलाकार यात दिसणार हे अजून तरी गुलदस्त्यात असलं तरी लवकरच याबाबत घोषणी केली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: भयंकर! बस चालवताना ड्रायव्‍हरचा हार्ट अटॅकने मृत्‍यू, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO

Gautami Patil: मकरंद अनासपुरे आणि गौतमी पाटील पहिल्यांदाच एकत्र दिसणार; ‘मूषक आख्यान चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Priya Bapat: '४२ व्या वर्षी मुलं जन्माला घालायचं...' प्रिया बापटनं ट्रोलिंग करणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

IPL 2025: आयपीएल गाजवलेले हे 3 खेळाडू लिलावात अन्सोल्ड जाणार; Base Price ही मिळणं कठीण

Railway Job: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ५६४७ रिक्त जागांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT