Bai Ga Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bai Ga Teaser : पाच बायका फजिती ऐका, 'वटपौर्णिमे'च्या दिवशी 'बाई गं'चा धमाकेदार टीझर रिलीज

Bai Ga Teaser Released : 'वटपौर्णिमा'च्या मुहूर्तावर स्वप्नील जोशीच्या 'बाई गं' चित्रपटाचा मजेशीर टीझर रिलीज झालेला आहे. ५ बायकांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा स्वप्नील कशी पूर्ण करतो ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Chetan Bodke

मराठी फिल्मइंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची मेजवानी अनुभवायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा', 'अल्याड पल्याड', 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' हे चित्रपट रिलीज झाले आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या ह्या चित्रपटांना प्रेक्षकांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच स्वप्नील जोशीचा 'बाई गं' चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा 'वटपौर्णिमा'च्या मुहूर्तावर मजेशीर टीझर रिलीज झालेला आहे.

या चित्रपटात स्वप्नील जोशी पाच अभिनेत्रींसोबत एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. असं म्हणतात, नवरा- बायकोच्या नात्यांची गाठ स्वर्गात बांधली -जाते. पण ही गाठ कधी, कुठे आणि कशी जुळते, हे कोणीही सांगू शकत नाही. स्वप्नील जोशीच्या 'बाई गं' ह्या आगामी चित्रपटामध्ये, आपलं प्रेम टिकवण्यासाठी एका नवऱ्याला चक्क ५ जन्मा आधीच्या आपल्या बायकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत. पण या इच्छा तो पूर्ण करू शकेल का? हे आपल्याला 'बाई गं' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

टीझरमध्ये, ५ बायकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वप्नील जोशीची कसरत पाहायला मिळत आहे. एका मद्यधुंद अवस्थेत देवाकडे पत्नीला परत मागतो. तेव्हा देव प्रसन्न होऊन त्याला त्याच्या पाच जन्मातील बायका परत करतो, असे सांगतो. त्या बायकांच्या जोपर्यंत अपूर्ण इच्छा पूर्ण होत नाहीत, त्याशिवाय त्या जाणार नाहीत, असं देव त्याला सांगतो. स्वप्नील मद्यधुंद अवस्थेत देवाला होकार देतो. पण दुसऱ्या दिवसापासून तो शुद्धीत आल्यानंतर त्याची खरी तारेवरची कसरत पाहायला मिळते. ५ बायकांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा स्वप्नील कशी पूर्ण करतो ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत स्वप्नील जोशीसह प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे आहे. "बाई गं" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' हा धम्माल चित्रपट 12 जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

Dhule MIM : धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का; जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

SCROLL FOR NEXT