Ajay Devgn Saam Tv
मनोरंजन बातम्या

Drishyam 2 : अजय देवगणच्या पोस्टनं 'सस्पेन्स' वाढला; 'दृश्यम २' की आणखी काही?...

अजयने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा 'दृश्यम' (Drishyam) हा क्राईम-थ्रिलर चित्रपट प्रचंड गाजला होता. मल्याळी चित्रपटाचा रीमेक असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण आणि तब्बूचा आगामी क्राईम थ्रिलर चित्रपट 'दृश्यम २' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अजयने नुकतीच सोशल मीडियावर(Social Media) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळं दृश्यम चित्रपटासारखाच सस्पेन्स वाढला आहे.

अभिनेता अजय देवगणने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना 'दृश्यम २' साठी जास्त वाट पाहावी लागणार नाही, असेच संकेत मिळतात. पोस्टमध्ये त्याने काही जुनी बिले शेअर केली आहेत. काही जुन्या पावत्या हाती लागल्या आहेत, अशी कॅप्शन देत त्यानं गूढ आणखीनच वाढवलं आहे.

अजय देवगणनं शेअर केलेली बिलं ही २०१४ ची आहेत. दृश्यम चित्रपटात अजय देवगणचं पूर्ण कुटुंब पणजीला गेल्याचं दाखवलं आहे. तिथं त्यांनी हॉटेलमध्ये जेवण केलं होतं. त्या दृश्याची आठवण या बिलांमुळं झाली आहे. त्यात अजय देवगणच्या पोस्टमधील कॅप्शनमुळं 'दृश्यम २' लवकरच येईल आणि आणखी काही तरी जबरदस्त कथानक बघायला मिळेल, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

अजयच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. त्याच्या एका चाहत्याने दृश्यम २ ऑन द वे, तर दुसऱ्या एका चाहत्याने दृश्यम २ लोड होत आहे, असे म्हटलं आहे. कमेंट्सवरून चाहते देखील चित्रपटाच्या प्रतीक्षेत असल्याचं म्हणता येईल.

आगामी काळात अजय देवगणचा थॅंक गॉड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंद्र कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये रकुलप्रीत सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच अजय देवगणचे मैदान, रेड २ , भोला हे चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

SCROLL FOR NEXT