Sushmita Sen  saam tv
मनोरंजन बातम्या

Video : हार्ट अटॅकनंतर Sushmita Sen आली लाईव्ह, अभिनेत्रीची अवस्था पाहून लोक झाले भावुक

Sushmita Sen : सुष्मिताने एक फोटो शेअर करत तिला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती.

Chandrakant Jagtap

Sushmita Sen News: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका पोस्टने चाहत्यांची चिंता वाढवली होती. सुष्मिताने एक फोटो शेअर करत तिला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती.

तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला होता. परंतु आता ती ठीक आहे. दरम्यान सुष्मिता सेनने नुकतेच लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत आपली आवस्था शेअर केली आहे. तसेच तिने चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.

सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन चाहत्यांना आपल्या तब्येतीविषयी माहिती दिली. तिने हार्ट अटॅकवर कशी मात केली याबाबत सांगितले. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांचे आणि वैद्यकीय पथकाचे विशेष आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये सुष्मिताचा घसा दुखत असून तिला बोलताना त्रास होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. (Latest Marathi News)

लाईव्ह आल्यानंतर सुष्मिता म्हणाली, 'मला खूप छान वाटत आहे. मला जवळपास सगळीकडून खूप प्रेम मिळाले आहे. याशिवाय लोक ज्या प्रार्थना आणि शुभेच्छा पाठवत आहेत त्याबद्दल धन्यवाद. मला बरे वाटत आहे आणि हा फक्त आवाज आहे, हे व्हायरल आहे. त्यामुळे मी चांगली नाही असे समजू नका. मला खूप बरे वाटत आहे. मी व्हायरलच्या लसीची वाट पाहिली असती तर मला हॅलो म्हणायला उशीर झाला असता. हे हवंच होतं. मला येऊन तुम्हा सर्वांना नमस्ते म्हणायचे होते'.

सुष्मिता पुढे म्हणाली, 'ऐका मित्रांनो, या गेल्या महिन्यात अनेक लोकांसोबत खूप काही घडले आहे. फक्त तुम्हाला सांगू इच्छिते की मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते. मी 95 टक्के ब्लॉकेजसह मोठ्या हृदयविकाराच्या झटक्यातून वाचले आहे. आज मी सर्वांसमोर आहेत तर ते नानावटी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच'. (Latest Entertainment News)

सुष्मिताने हे देखील सांगितले की, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांनी तिच्या गोपनीयतेचा कसा आदर केला आणि तिच्या तब्येतीबद्दल लोकांना सांगितले नाही. सुष्मिता म्हणाली की, ती आर्या 3 च्या सेटवर परत येण्यासाठी खूप उत्साहित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे ₹१५०० जमा झाले, तुम्हाला आले का?

EPFO मध्ये मोठा बदल; आधीच्या बंद झालेल्या PF खात्यातील पैसा येईल थेट तुमच्या बँक खात्यात

Pune : पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा अचानक छापा, खिडकीतून तरूणीची उडी, जागेवरच मृत्यू

Success Story: शाळा, कॉलेजमध्ये फेल, दोनदा केली UPSC पास; IAS अनुराग कुमार यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT