Sushmita Sen Back to work Instagram
मनोरंजन बातम्या

Sushmita Sen: मोठ्या दुर्घटनेनंतर सुष्मिता कामावर परतली; 'ताली'चे डबिंग करत केला कामाचा श्री गणेशा

Taali Dubbing: अभिनेत्री सुष्मिताने 'ताली'चे डबिंग सुरू केले आहे.

Saam Tv

 Sushmita Sen Returns To Work: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. सुष्मिताच्या या वृत्ताने अनेकांना धक्का बसला होता. इतक्य फिट अभिनेत्रीसोबत घडलेली ही घटना दुर्दैवी होती.

सुष्मिताची प्रकृती आता बारी आहे आणि तिने कामाला देखील सुरूवात केली आहे. सुष्मिता लवकरच 'आर्या' या वेबसीरीज आणि 'ताली' चित्रपटच्या पुढील सीझनमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने 'ताली'चे डबिंग सुरू केले आहे. अलिकडेच ती डबिंग स्टुडिओबाहेर स्पॉट झाली. यादरम्यान सुष्मिता खूप आनंदी दिसत होती आणि पापाराझींसाठी पोज देताना दिसली.

सुष्मिताने यावेळी ब्लू टॉप आणि पॅन्टमध्ये दिसली. नेहमीप्रमाणे तिने चष्मा घातला होता. सुष्मिताचा 'ताली' हा चित्रपट ट्रान्सवुमन गौरी सावंतच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सुष्मिता गौरीच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटातील सुष्मिताची लूक तिने शेअर केला होता. तिने शेअर केलेल्या पहिल्या पोस्टरमध्ये सुष्मिताने मोठ्या लाल रंगाची टिकली लावली आहे. तसेच टाळी वाजवताना ती दिसत आहे. अभिनेत्रीच्या या लूकमुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. रवी जाधव 'ताली'चे दिग्दर्शन करत आहेत. तर क्षितिज पटवर्धन यांनी चित्रपट लिहिला आहे.

सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला होता. तिने 2 मार्च रोजी एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती. वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करत सुष्मिताने लिहिले, 'तुझं मन आनंदी ठेव. जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा असेन. हे शब्द माझ्या वडिलांचे आहेत. यानंतर, अभिनेत्रीने हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितले आणि सांगितले की तिने अँजिओप्लास्टी आणि स्टेंट केलं आहे.

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर सुष्मिता आता बरी असून कामावर परतली आहे. बरी झाल्यानंतर तिने लॅक्मे फॅशन वीकमध्ये पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात रॅम्प वॉकही केला. आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या आजारपणामुळे चिंतेत असलेल्या चाहत्यांसाठी, तिचे कामावर परत येणे ही एक खूप आनंदाची बातमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT