Sushmita Sen Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sushmita Sen Received Doctorate: सुष्मिता सेनच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा; पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद

Pooja Dange

Sushmita Sen share Post After Receiving:

अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या आगामी वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. सुष्मिताची 'ताली' ही श्री गौरी सावंत यांच्यावर आधारित वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान सुष्मिता सेनच्या आयुष्यात एक महत्त्वाची घटना घडली आहे.

सुष्मिता सेनला पश्चिम बंगालमधील टेक्नो इंडिया युनिव्हर्सिटीने डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी दिली आहे. सुष्मिता सेनने पोस्ट करत ही माहिती देत आनंद व्यक्त केला असून सगळ्यांचे आभार मानले आहेत.

सुष्मिता सेनने तिच्या पदवीचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, किती मोठा सन्मान आहे!!!! मला मानद डी. लिट बहाल केल्याबद्दल टेक्नो इंडिया युनिव्हर्सिटी आणि श्री नारायण मूर्ती यांना धन्यवाद. कोलकाता येथे माझ्या वतीने डॉक्टरेट घेण्यासाठी माझे वडील हॅले होते. विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांचे खूप आभार. त्यांनी या या समारंभाचे आयोजन खूप छान केले होते. इतके प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार !!!

तर दुसरी पोस्ट करत सुष्मिताने लिहिलं आहे की, माननीय (डॉ.) सुष्मिता सेन, मला हे सगळं एकत्र असं दिसत हे पाहायचं होत!!! सर्वात जास्त व्हायरल झाल्यामुळे वैयक्तिकरित्या डी.लिट सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही…पण काल ​​माझ्या वडिलांनी यांना माझ्यावतीने हा सन्मान स्वीकारला यासाठी… तेच सर्व काही आहेत!!! धन्यवाद बाबा!!!!' (Latest Entertainment News)

सुष्मिता सेन आजारी असल्याने तिच्यावतीने तिचे वडील या सोहळ्याला गेले होते. वडिलांचे कौतुक करत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच टेक्नो इंडिया या विद्यापीठाचे आभार मानले आहेत.

सुष्मिता सेनची 'ताली' ही वेबसीरीज १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 'आर्या ३'नंतर हा सुष्मिताचा पहिला प्रोजेक्ट आहे. दरम्यान सुष्मिताला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. तिला हृदय विकाराचा झटका देखील आला होता. या धक्कातून सावरत सुष्मिताने एक प्रोजेक्ट यशस्वी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT