CBI court acquits Sooraj Pancholi Saam TV
मनोरंजन बातम्या

Jiah Khan Case: जिया खान प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय

Sooraj Pancholi in Jiah Khan Case: जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Pooja Dange

CBI court acquits Sooraj Pancholi in Jiah Khan Case: बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने ३ जून, २०१३ ला स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवले होते. आत्महत्येनंतर तिच्या घरातून सहा पानांचे सुसाईड नोट सापडले होते. जे जिया खानने लिहिले असल्याचे सांगण्यात आले होते. त्या नोट नुसार जियाचा बॉयफ्रेंड सुरज पांचोलीने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात २० एप्रिलला सीबीआयचे विशेष जज एएस सैयद यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून अंतिम युक्तिवाद शेवटच्या सुनावणीला राखून ठेवला होता. जिया खान प्रकरणावर आज म्हणजे २८ एप्रिलला सकाळी १०:३० वाजता सीबीआयच्या विशेष न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली.

जिया खान आत्महत्या प्रकरणात पुराव्याच्या कमतरतेमुळे हे न्यायालय तुम्हाला (सूरज पांचोली) दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे निर्दोष मुक्तता केली, असे मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद म्हणाले आहेत. जिया खान आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोली याची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दिवंगत अभिनेत्री जिया खानची आई राबिया खानने सूज पांचोलीवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर सुरज पांचोलीला १० जून २०१३ला अटक करण्यात आली होती. सुरज पांचोली १५ दिवसांहुन अधिक दिवस पोलीस कोठडीत होता.

त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर जुलै २०१४ला हे प्रकरण ५ वर्षासाठी सीबीआयकडे होते. जियाच्या आईने देखील सांगितले की हत्या नसून आत्महत्या आहे. मुंबई उच्च न्यालयाने या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करणारी याचिका फेटाळून लावली होती.

जिया खान आत्महत्या प्रकरणाचा १० वर्षांनी निकाल लागला आहे. या प्रकरणात जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुरावे नसल्याने न्यायालयाने हा निकाल दिला आहे. (Latest Entertainment Movie)

तर जियाच्या आईने सीबीआय कोर्टाला दिलेल्या एक निवेदन केले होते म्हटले होता की, पोलीस आणि सीबीआय या दोघांनी सूरज आरोपी आहेत हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे गोळा केलेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT