Zapuk Zupuk Movie Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Zapuk Zupuk Movie Box Office Collection : सूरजला मिळाला गुलीगत धोका, सहाव्या दिवशी कमाईत झाली मोठी घट

Zapuk Zupuk Movie Box Office Collection Day 6 : सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट रिलीज होऊन आता सहा दिवस झाले आहेत. या चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk ) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याला 'बिग बॉस' मुळे खूप लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर रील्स बनवणारा सूरज आता मोठा पडदा गाजवत आहे. त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिल रिलीज झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून 'झापुक झुपूक' च्या कलेक्शनमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे सहाव्या दिवसाचे कलेक्शन (Zapuk Zupuk Movie Box Office Collection Day 6) जाणून घेऊयात.

'झापुक झुपूक' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

मीडिया रिपोर्टनुसार, सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाने एकूण 1.19 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर रिलीजच्या सहाव्या दिवशी 9 लाख रुपयांची कमाई केली आहे.

  • दिवस पहिला - 24 लाख

  • दिवस दुसरा - 24 लाख

  • दिवस तिसरा - 19 लाख

  • दिवस चौथा - 14 लाख

  • दिवस पाचवा - 17 लाख

  • दिवस सहावा - 9 लाख

  • एकूण - 1.19 कोटी

'झापुक झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. 'झापुक झुपूक' ही एक प्रेम कथा आहे. या चित्रपटात विनोद, प्रेम आणि भावनांचे उत्तम चित्रण केले आहे. चित्रपटाच्या गाण्यांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सूरजसोबत चित्रपटात अनेक मराठी कलाकार पाहायला मिळत आहे. यांच्यात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे या कलाकारांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT