Sur Nava Dhyas Nava 6th Season Finalist Gopal Gawande Instagram
मनोरंजन बातम्या

Sur Nava Dhyas Nava 6th Season Finalist: अकोल्याचा गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महागायक...

Sur Nava Dhyas Nava 6th Season News: ‘सूर नवा ध्यास नवा आवाज तरुणाईचा’ या पर्वामध्ये अकोल्याचा गोपाळ गावंडे विजेता ठरला आहे.

Chetan Bodke

Sur Nava Dhyas Nava 6th Season Finalist Gopal Gawande

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या म्युझिकल शोच्या सहाव्या पर्वाचा ३१ डिसेंबरला सायंकाळी Grand Finale सोहळा अगदी दिमाखात पार पडला. ‘आवाज तरुणाईचा’ या पर्वामध्ये अकोल्याचा गोपाळ गावंडे विजेता ठरला आहे. यावेळी त्याची टॉप ३ स्पर्धकांमधून निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या उल्लेखनीय प्रवासात, गोपाळने उत्कृष्ट सादरीकरण आणि अपवादात्मक कामगिरी सादर करीत तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला. या पर्वात मराठीसह काही हिंदी गाणेही जुनी गाणी नव्या अंदाजात ऐकायला मिळाली. या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद लाभला. ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या सहाव्या पर्वाच्या GRAND FINALE मध्ये एकूण सहा स्पर्धक होते. त्यामध्ये अनिमेष ठाकूर, मृण्मयी भिडे, आदिश तेलंग, अनुष्का शिकतोडे, अंतरा कुलकर्णी आणि गोपाळ गावंडे हे सहा स्पर्धक टॉप ६ मध्ये होते.

यामधून टॉप ३ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये, गोपाळ गावंडे, अंतरा कुलकर्णी आणि अनिमेश ठाकूर अशा तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या म्युझिकल शोच्या सहाव्या पर्वाची उपविजेती अंतरा कुलकर्णी ठरली आहे. तर विजेता गोपाळ गावंडे ठरला आहे.

गोपाळ गावंडेचा अतुलनीय आत्मविश्वास आणि त्याच्या दमदार कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्याला राजगायकाचा मान मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घातली, त्यामुळे खरोखरच हा कार्यक्रम प्रेक्षकांसह सर्वांच्याच संस्मरणीय ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT