Yash Saam TV
मनोरंजन बातम्या

Superstar Yash Birthday: महागडं घर, अलिशान कार कलेक्शन... करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे सुपरस्टार यश

'केजीएफ'च्या यशानंतर कन्नड इंडस्ट्रीतील महागड्या कलाकारांमध्ये यशचा समावेश झाला.

साम टिव्ही ब्युरो

Superstar Yash Birthday: KGF फेम 'रॉकी भाई' अर्थात सुपरस्टार यश आज 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. यश आज कन्नड इंडस्ट्रीतील  (Tollywood)सर्वात महागड्या कलाकारांपैकी एक आहे. यशचा इथवरचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. आज यश करोडोंची संपत्ती, अलिशान घर, अनेक गाड्यांचा मालक आहे.

सुपरस्टार यशचे वडील अरुण कुमार कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळात बस चालक आहेत. 2004 मध्ये कन्नड टीव्ही सीरियल 'नंदा गोकुळ'मधून पदार्पण केल्यानंतर यशला 2007 मध्ये 'जंबडा हुडगी' हा चित्रपट मिळाला. यशने यानंतर अनेक चित्रपट केले, पण 'केजीएफ'मधून त्याला जी ओळख मिळाली ती या सर्वांच्या पलीकडे आहे. 'केजीएफ'च्या यशानंतर कन्नड इंडस्ट्रीतील महागड्या कलाकारांमध्ये यशचा समावेश झाला.

रिपोर्ट्सनुसार, 'KGF' च्या यशानंतर यशने बंगळुरूमध्ये एक आलिशान डुप्लेक्स घर खरेदी केले, जिथे तो त्याच्या कुटुंबासह राहतो. या डुप्लेक्सची किंमत चार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरूच्या पॉश कॉलनी प्रेस्टीज गोल्फ अपार्टमेंटमध्ये त्याचे अपार्टमेंट आहे.

कार कलेक्शन

यशला गाड्यांचीही खूप आवड आहे. यशकडे एक कोटी किमतीची Audi Q7 आणि 80 लाख रुपयांची रेंज रोव्हर, 70 लाख रुपयांची BMW, 40 लाख रुपयांची पजेरो स्पोर्ट्स, Mercedes Benz DLS (85 लाख) आणि Mercedes Benz GLC (78 लाख) या महागड्या कार आहेत.

यशने 'केजीएफ'साठी 6 कोटी रुपये घेतले होते. तर 'केजीएफ चॅप्टर 2'साठी त्याने 30 कोटी रुपये घेतले. 'केजीएफ'पासून यशची फी वाढली आहे. याशिवाय अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करूनही यश पैसे कमावतोय. एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी तो सुमारे ६० लाख रुपये आकारतो, अशी माहिती आहे. सध्या यश जवळपास 53 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. गेल्या काही वर्षांत त्याच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT