Rajnikant  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rajinikanth In Himalaya : 'जेलर' प्रदर्शित होण्याआधी रजनीकांतनी गाठले हिमालय; काय आहे नेमकं कारण?

Jailer Movie Released : चित्रपट प्रदर्शित होण्याआधी रजनीकांत हिमालयात गेले आहेत.

Pooja Dange

Rajinikanth Went To Himalaya Before Jailer Movie Released :

सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या 'जेलर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आज म्हणजे 10 ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तमन्ना भाटियापासून ते अगदी जॅकी श्रॉफसारखे स्टार्सही 'जेलर'मध्ये दिसणार आहेत.

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी रजनीकांत हिमालयात गेले आहेत. 'जेलर' रिलीज होण्याच्या एक दिवस आधी बुधवारी ते हिमालयात गेला आहेत. कामापासून मुक्ती, शांती मिळावे यासाठी ते शहरापासून दूर गेले आहेत.

रजनीकांत यांची हिमालयात जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते अनेकदा तिथे तिथे गेले आहेत. याआधी ते हिमालयातील मंदिरात दिसले होते. गेल्या चार वर्षांपासून कोरोनामुळे ते हिमालयात जाऊ शकले नव्हते. आता ते कामातून मोकळा होऊन त्यांच्या आवडत्या ठिकाणी निघून गेला आहेत. (Latest Entertainment News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत आणि त्यांच्या काही मित्रांनी हिमालयात एक ध्यान केंद्रही बनवले आहे. म्हणून ते येथे वारंवार जात असतात.

रजनीकांत यांच्या 'जेलर' या आज प्रदर्शित झालेला चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. जेलरने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच सुमारे १३ कोटी रुपये कमावले आहेत.

'जेलर'ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीत 'गदर 2' आणि OMG 2 लाही मागे टाकले आहे. हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होत नाही. याचा अर्थ अ‍ॅडव्हान्स बुकिंग करूनही मोठा प्रेक्षक या चित्रपटाशी जोडू शकलेला नाही.

'जेलर'चे दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार यांनी केले आहे. हा अ‍ॅक्शन चित्रपट सेन्सॉरने UA सर्टिफिकेटसह पास केला आहे, ज्यामध्ये जॅकी श्रॉफ, शिव राजकुमार, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, योगी बाबूपासून ते वंसत रवीपर्यंतचे सर्व स्टार्स दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT