Dasara Box Office Collection
Dasara Box Office Collection You Tube
मनोरंजन बातम्या

Dasara Hit Before Release: बॉक्स ऑफिसवर ‘दसरा’ची धूम, प्रदर्शनाआधीच थिएटर हाऊसफुल्ल...

Chetan Bodke

Dasara Movie Getting Huge Opening: सध्या भारतीय चित्रपटसृष्टीवर दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला सुरू आहे. दाक्षिणात्य चित्रपटांनीच बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अग्रस्थानी राहिले आहेत. पुष्पा, केजीएफ, कांतारा, RRR आणि आता लवकरच ‘दसरा’ चित्रपट या यादी मध्ये सामील होणार आहे.

‘दसरा’ चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा टीझर पाहताच सोशल मीडियावर ‘पुष्पा’सारखा हा चित्रपट आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. छोट्याश्या गावातील एक मुलगा गावकऱ्यांसाठी संघर्ष करताना दिसला.

टीझरमध्ये पुस्पासारखेच दमदार डायलॉग आहेत. ‘दसरा’ चित्रपट येत्या ३० मार्चला प्रदर्शित होणार असून त्या आधीच थिएटर हाऊसफुल्ल झाले आहेत. चित्रपटाची जास्त तिकिटं विकले गेले असल्याने प्रेक्षक शो वाढण्यासाठी मागणी करत आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी आता पहिला शो सकाळी ५ वाजता ठेवला असून शेवटचा शो मध्यरात्री ठेवला आहे.

चित्रपटाचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात एकाच वेळी तब्बल एकूण १३०० स्क्रीन्सवर दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवसापासून धमाका करणार असल्याची चर्चा सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रंगली आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतात, तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे.

याच्या सोबतच बॉलिवूडमध्ये अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता बॉलिवूड चित्रपट आणि दाक्षिणात्य चित्रपट एकमेकांसमोर येऊन उभे ठाकलेत. त्यामुळे आता कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी होतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘दसरा’ चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेला यांचे असून चित्रपटात प्रमूख भूमिकेत नानी बरोबर कीर्ती सुरेश, संतोष नारायण हे कलाकार सुद्धा झळकणार आहेत. नानीच्या करियरमधला हा सर्वाधिक हिट चित्रपट ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil on Jay Pawar Meeting | जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? दिले स्पष्टीकरण

Sunidhi Chauhan : चाहत्याने पाण्याची बाटली फेकली, तरीही गात राहिली; सुनिधी चौहानने सांगितला लाइव्ह कॉन्सर्टमधील 'तो' किस्सा

Relationship : वारंवार पार्टनरला मॅसेज केल्यास नात्यात येईल दुरावा; चुकूनही 'या' चुका करू नका

Maval Constituency : मावळ मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षांचा भंग, वर्षानुवर्ष सागरी पूल राहिला कागदावरच

Online Payment: 'या' टीप्स वापरा करा तुमचे UPI खातं सुरक्षित

SCROLL FOR NEXT