Super Duperr Saam Tv
मनोरंजन बातम्या

Super Duperr Movie: एक फ्लॅट, दोन कुटुंब...; निर्मिती सांवत आणि च्या 'सुपर डुपर'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Super Duperr Marathi Movie: ‘सुपर डुपर’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. विनोद, नाती आणि कौटुंबिक मनोरंजनाचा संगम असलेला हा चित्रपट ३ एप्रिलला प्रदर्शित होणार.

Shruti Vilas Kadam

Super Duperr Marathi Movie: यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांसाठी धमाल मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘सुपर डुपर’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नावाप्रमाणेच ट्रेलरही ‘सुपर डुपर’ ठरला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ट्रेलर लाँच सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. ट्रेलरमध्ये एका घराभोवती फिरणारा मजेशीर गोंधळ दाखवण्यात आला आहे. एका बाजूला परंपरांना जपणारे गावाकडील कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारसरणी असलेले शहरातील तरुण जोडपे—अशा दोन भिन्न स्वभावाच्या कुटुंबांची गोष्ट यात रंगवण्यात आली आहे. योगायोगाने एकाच फ्लॅटची विक्री या दोघांनाही होते आणि याच कारणावरून वाद निर्माण होतो. एकाच घरात राहण्याची वेळ आल्यावर त्यांच्या सवयी, विचार आणि जीवनशैलीतील फरकांमुळे अनेक विनोदी प्रसंग घडताना दिसतात.

या सगळ्या गमतीदार गोंधळात ‘झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच’ हा निर्मिती सावंत यांच्या तोंडी असलेला संवाद विशेष लक्ष वेधून घेतो. विनोदासोबतच नात्यांमधील ऊब आणि भावनिक क्षणांचा सुंदर संगम ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.तर, छायांकनाची जबाबदारी संजय जाधव यांनी सांभाळली आहे.

दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी सांगितले की, हा चित्रपट केवळ विनोदी नसून नात्यांमधील भावनिक बाजूही हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडतो. तर झी स्टुडिओज् मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र अनुभवावा, असा विश्वास व्यक्त केला आहे. ३ एप्रिलपासून प्रदर्शित होणारा ‘सुपर डुपर’ हा चित्रपट यंदाच्या उन्हाळ्यात प्रेक्षकांसाठी एक खास कौटुंबिक मनोरंजनाचा अनुभव ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guava Benefits: सफरचंद खाण्यापेक्षा रोज 'हे' फळं खा; मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: नाशिकच्या रस्त्यांवरून सरकारवर निशाणा; उद्योगांबाबतही गंभीर सवाल

Shiv Sena SC Case Live : आजची सुनावणी संपली, कोर्टानं दिली पुढची तारीख, वाचा युक्तिवादाचा शब्द ना शब्द

Cockroach : झुरळांमुळं हैराण झालात? घरातून झुरळांना पळवून लावण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

Light Bill hike : महावितरणचा शॉक! तुम्हाला वीज बिल जास्त येणार, किती युनिटला किती दरवाढ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT