Gadar 3 Announcement  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gadar 3: तारा सिंह पुन्हा थिएटर गाजवणार, ‘गदर ३’मध्ये मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी, रिलिज डेट आली समोर

Chetan Bodke

Gadar 3

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. ‘गदर’च्या घवघवीत यशानंतर तब्बल २२ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘गदर २’ आला. तारा सिंह आणि सकिनाची जोडी प्रेक्षकांना फारच भावली असून चित्रपटाने एकट्या भारतातच ५२५ कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदरच्या तिसऱ्या भागाबद्दल माहिती दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ यशस्वी घोडदौड करत असताना, प्रेक्षकांना ‘गदर ३’बद्दलची उत्सुकता होती. निर्माते लवकरच ‘गदर’च्या तिसऱ्या भागाची तयारी करत असून लवकरच चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग २००१, दुसरा भाग २०२३ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाबद्दलची माहिती प्रेक्षकांना २०२४ मध्ये मिळणार आहे. तर हा चित्रपट २०२५ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘गदर ३’चे शूटिंग बनारसमध्ये होणार असून या चित्रपटाचं शूटिंग १४ ते १५ दिवस इतर वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. ‘गदर ३’मध्ये अमिषा पटेल, सनी देओल यांच्यासोबत नाना पाटेकर सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा नाना पाटेकर यांच्या पात्राभोवती फिरणार असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या शुटिंगला पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. (Bollywood Film)

‘गदर’मध्ये तारा सिंग आणि सकिनाच्या लव्हस्टोरी, ‘गदर २’मध्ये उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौरची लव्हस्टोरी पाहायला मिळाली. तर आता पुढे ‘गदर ३’मध्येही प्रेक्षकांना उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौरची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. मनीष वाधवाचा मुलगा खलनायक बनून आता पुढच्या भागात आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार आहे.

“ ‘गदर ३’ साठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट पाहायला लागणार आहे. सब्र का फल मीठा होता हैं... प्रतिक्षा केल्यामुळे तुम्हाला त्याचे फळ नक्कीच चांगले मिळेल. ‘गदर: एक प्रेम कथा’ , ‘गदर २’प्रमाणेच ‘गदर ३’ सुद्धा दमदार कलाकृती असेल यात काही शंका नाही.” ‘गदर ३’बद्दल दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले. १९४७च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाची कथा आहे. त्याच कथेवर आधारित या चित्रपटाचा ‘गदर २’ हा सिक्वेल सुद्धा आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

Women's T20 WC: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! लाजिरवाण्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ; पाहा Points Table

Chandrapur School Bus Accident : विद्यार्थांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, बसमध्ये होते ६० विद्यार्थी

Vastu Tips for Sleeping: झोपतेवेळी बेडजवळ चुकूनही ठेऊ नयेत 'या' गोष्टी; गरीबी पाठ सोडणार नाही!

SCROLL FOR NEXT